मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Richa Chadha: रिचा चड्ढा आणि अली फजलने केले दुसऱ्यांदा लग्न, रिसेप्शनला केला खुलासा

Richa Chadha: रिचा चड्ढा आणि अली फजलने केले दुसऱ्यांदा लग्न, रिसेप्शनला केला खुलासा

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 05, 2022 08:31 AM IST

Richa Chadha Ali Fazal Wedding: अडीच वर्षांपूर्वीच रिचा आणि अली फजलने गुपचूप लग्न केले होते.

रिचा चड्ढा आणि अली फजल
रिचा चड्ढा आणि अली फजल (HT_PRINT)

बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. दिल्लीत राहणारी रिचा आणि लखनऊचा अली फजल लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता अखेर त्यांचा विवाह सोहळा पार पडला आहे. पण अली आणि रिचाचे हे पहिले लग्न नाही. त्यांनी अडीच वर्षांपूर्वीच लग्न केले होते.

रिचा आणि अली बराच काळ रिलेशनशीपमध्ये होते. ते दोघेही लग्नाचा विचार करत होते. एप्रिल २०२०मध्ये त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण करोना महामारीमुळे त्यांना ते शक्य झाले नाही. त्यांनी लग्नाचा निर्णय कॅन्सल केला. पहिल्या लॉकडाऊननंतर रिचा चड्ढा आणि अली यांनी कोर्टात लग्न केल्याचे म्हटले जाते.
वाचा : अमिताभ बच्चन यांना मराठी चित्रपटाची भूरळ, ट्रेलर शेअर करत म्हणाले...

२०२१मध्ये त्यांनी पुन्हा लग्नाचा प्लॅन केला होता. पण पुन्हा करोनाची दुसरी लाट आली. आता रिचा आणि अली यांच्याकडून लग्नाबाबत ऑफिशियल स्टेटमेंट आले आहे. या स्टेटमेंटमध्ये त्यांनी अडीच वर्षांपूर्वी रजिस्टर लग्न केल्याचे सांगितले आहे. आता केवळ परिवार आणि मित्रांसोबत आनंद साजरा करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्ली आणि लखनऊमध्ये त्यांनी रिसेप्शन ठेवले होते.

लवकरच अली आणि रिचा मुंबईत रिसेप्शन ठेवणार आहेत. त्यांच्या या रिसेप्शनला अनेक बॉलिवूड कलाकार हजेरी लावण्याची शक्यता आहे. या रिसेप्शनसाठी ते दोघेही पारंपरिक पेहराव करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

IPL_Entry_Point

विभाग