बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा कायमच सर्वांच्या आठवणीत राहिला आहे. सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही देखील तेव्हापासून चर्चेत आहे. सुशांतच्या निधनानंतर रियावर अनेक आरोप करण्यात आले. आता रियाने पॉडकास्टच्या माध्यमातून मनोरंजन विश्वात पुनरागमन केले आहे. या पॉडकास्टमध्ये तिने तुरुंगात असतानाचा किस्सा सांगितला आहे. हा किस्सा ऐकून तुम्ही देखील चकीत व्हाल.
रिया चक्रवर्तीने 'चॅप्टर-२' नावाचे पॉडकास्ट सुरू केले आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये तिने सुष्मिता सेन, आमीर खान, शिबानी दांडेकर आणि फराह खान सारख्या सेलिब्रिटींसोबत पॉडकास्ट केले आहे. आता तिचे नवीन पॉडकास्ट प्रसिद्ध रॅपर-सिंगर यो यो हनी सिंगसोबत आहे ज्यामध्ये रिया चक्रवर्ती मानसिक समस्यांबद्दल बोलताना दिसली. संभाषणादरम्यान रिया आणि हनी सिंग यांनी बायपोलर डिसऑर्डरचे गांभीर्य समजून घेण्याविषयी आणि त्याबद्दल जागरूक असणे कसे महत्वाचे आहे याबद्दल चर्चा केली.
रिया चक्रवर्तीने बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर तुरुंगात घालवलेल्या काळाबद्दलही सांगितले. रिया चक्रवर्ती म्हणाली, पोलिसांनी तिचे आभार मानले की तिने तिथल्या सर्वांना मानसिक आजाराबद्दल सांगितले. हनी सिंगसोबत बोलताना रिया चक्रवर्ती म्हणाली, 'मी बायपोलर डिसऑर्डर खूप जवळून पाहिला आहे. तुमची मुलाखत पाहिल्यानंतर तुम्ही तुमचा अनुभव कसा शेअर केला हे पाहून मी भावूक झाले. या सर्व गोष्टी अतिशय वैयक्तिक आहेत. आणि हा आजार असा आहे की अनेकांना आपला अनुभव सांगता येत नाही.
हनी सिंगबद्दल चिंता व्यक्त करताना रिया चक्रवर्ती म्हणाली, "लोकांना बायपोलर डिसऑर्डर समजत नाही. लोकांना एकतर रुग्ण वेडा वाटतो किंवा त्याच्यावर भुताची सावली आहे असे त्यांना वाटते. मी तुरुंगात असताना सुसाईड वॉच नावाचे एक माध्यम होते. हे माध्यम संवेदनशील प्रकरणांमध्ये गुंतलेल्या लोकांसाठी होते. विशेषत: त्या व्यक्तीने कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नये म्हणून हे करण्यात आले. आता मला विलगीकरणात ठेवण्यात आल्याने माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी दोन महिला ठेवण्यात आल्या होत्या. मी त्या महिलांशी बोलू लागले. त्यानंतर मी मानसिक आरोग्याविषयी बोलायला लागले.
रिया चक्रवर्तीने तुरुंगात घालवलेल्या वेळेचा अनुभव शेअर करताना सांगितले की, "मी जवळपास 15 दिवस मानसिक आरोग्याबद्दल बोलत होते, मी गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत होते, माझ्या आयुष्यात घडत असलेल्या सर्व गोष्टी सांगत होते. सोळाव्या दिवशी एका महिलेने सांगितले की, मी माझ्या गावी जात आहे. ती म्हणाली की लोक तिच्या पतीला पिंपळाला बांधतात कारण त्यांना वाटते की त्याच्यावर भूत आहे. पण तुझं बोलणं ऐकल्यावर मला वाटतं की माझा नवराही याच समस्येने त्रस्त आहे.
वाचा: अमृता सिंगने एकदा सैफ अली खानला दिल्या होत्या झोपेच्या गोळ्या, काय होते कारण?
जामिनाच्या वेळी तिला भेटायला आलेल्या महिलेने सांगितले की, माझ्यामुळे तिला हे सर्व समजले म्हणून तिने माझे आभार मानले. रिया चक्रवर्तीने सांगितले की, जामिनाच्या दिवशी ही महिला तिला भेटण्यासाठी ही आली होती. ती आली आणि अभिनेत्रीला म्हणाली, "तुझं म्हणणं बरोबर होतं, त्याला (महिलेच्या नवऱ्यालाही) बायपोलर डिसऑर्डर असल्याचं निदान झालं आहे. रिया म्हणाली की, अनेकदा तिला असे वाटते की कदाचित ती तुरुंगात गेली असेल जेणेकरून ती त्या व्यक्तीला वाचवू शकेल. "
संबंधित बातम्या