Resham Tipnis birthday : नवऱ्याच्या अफेअरबद्दल कळताच अभिनेत्रीनं स्वतः लावून दिलं होतं लग्न! हा किस्सा ऐकलात?-resham tipnis birthday special story actress did all function arrangements for husbands second marriage ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Resham Tipnis birthday : नवऱ्याच्या अफेअरबद्दल कळताच अभिनेत्रीनं स्वतः लावून दिलं होतं लग्न! हा किस्सा ऐकलात?

Resham Tipnis birthday : नवऱ्याच्या अफेअरबद्दल कळताच अभिनेत्रीनं स्वतः लावून दिलं होतं लग्न! हा किस्सा ऐकलात?

Aug 28, 2024 10:46 AM IST

Resham Tipnis Birthday Special Story: अभिनेत्री रेशम टिपणीस हिने आपल्या पतीला दुसऱ्या लग्नाची परवानगी तर दिलीच, आणि लग्नाची तयारी करण्यात देखील मदत केली होती.

Reshma Tipnis Birthday: नवऱ्याच्या अफेअरबद्दल कळताच अभिनेत्रीनं स्वतः लावून दिलं होतं लग्न!
Reshma Tipnis Birthday: नवऱ्याच्या अफेअरबद्दल कळताच अभिनेत्रीनं स्वतः लावून दिलं होतं लग्न!

Happy Birthday Resham Tipnis: आपल्या दमदार अभिनयाने मराठी मनोरंजन विश्व गाजवणारी अभिनेत्री रेशम टिपणीस हिचा आज (२८ ऑगस्ट) वाढदिवस आहे. रेशमने केवळ मराठीच नव्हे, तर मनोरंजन विश्वात देखील आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. तिचं व्यावसायिक आयुष्य जितकं चर्चेत होतं, तितकंच तिचं वैयक्तिक आयुष्य देखील नेहमी चर्चेत राहिलं आहे. रेशमने खूप कमी वयातच लग्न केलं होतं. मात्र, तिचा संसार फार काळ टिकू शकला नाही. लग्नाच्या काही वर्षांनंतर ती आपल्या पतीपासून वेगळी राहू लागली होती. मात्र, या दरम्यान आपल्या पतीच्या अफेअरबद्दल कळताच अभिनेत्रीने मोठे पाऊल उचलले होते.

आपण अनेकदा चित्रपट किंवा मालिकांमध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सबद्दल ऐकतो आणि पाहतो. अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यात अनेकदा अशा अफेअर्सची चर्चा होते. असे देखील घडले आहे की, काही स्टार्सनी त्यांचे पहिले लग्न मोडून दुसरे लग्न केले आहे. पण, अभिनेत्री रेशम टिपणीस हिने आपल्या पतीला दुसऱ्या लग्नाची परवानगी तर दिलीच, आणि लग्नाची तयारी करण्यात देखील मदत केली होती. तिनेच आपल्या पतीचं दुसरं लग्न लावून दिलं होतं.

२०व्या वर्षी बांधली होती लग्नगाठ

अभिनेत्री रेशम टिपणीसने वयाच्या २०व्या वर्षी 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील अभिनेता संजीव सेठसोबत लग्न केले होते. दोघांच्या वयात १२ वर्षांचा फरक होता, पण लग्नानंतर ११ वर्षांनी त्यांच्यात मतभेद वाढले आणि ते वेगळे झाले. मात्र, त्यानंतरही संजीव आणि रेशम यांनी एकमेकांना घटस्फोट दिला नाही. या जोडप्याला दोन मुलेही होती. विभक्त झाल्याच्या तीन-चार वर्षांनंतर संजीव सेठ यांची सहकलाकार लता सभरवाल यांच्याशी जवळीक वाढू लागली होती. संजीव यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यावेळी लताला त्यांच्या पहिल्या लग्नाबद्दल सर्व माहिती होती.

अवघ्या २०व्या वर्षी रेशीम टिपणीसने बांधली होती लग्नगाठ! पदरी दोन मुलं पडली अन्...

पतीच्या अफेअरबद्दल कळताच...

मालिकेत म्हणजेच रील लाईफमध्ये संजीव आणि लता पती-पत्नीच्या भूमिकेत होते. याच दरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले. संजीवने लताला सांगितले होते की, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, पण रेमशा आणि मुलांच्या परवानगीशिवाय लग्न करणार नाही. संजीवने एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा त्याने रेशमशी लग्नाबद्दल चर्चा केली, तेव्हा ती खूप खूश झाली होती आणि मुलांनीही आनंदाने दुसऱ्या लग्नाला परवानगी दिली. एवढेच नाही तर, संजीवच्या लग्नासाठी रेशम इतकी उत्साहित झाली की, तिने स्वतः संजीवच्या लग्नाची तयारी सुरू केली.

२०१०मध्ये 'ये रिश्ता क्या कहलाता है'च्या रील लाईफ कपलने खऱ्या आयुष्यात एकमेकांचा हात धरला होता. लता आणि रेशम यांची मैत्री झाली आणि लताने संजीवच्या पहिल्या मुलांनाही आपलंस केलं. लता आणि संजीव यांना एक मुलगाही आहे. मात्र, रेशमने आपल्या मुलांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि अद्याप दुसरे लग्न केलेले नाही.

विभाग