Republic Day 2024: बॉलिवूडच्या अभिनेत्रींनीही मोठ्या पडद्यावर दाखवली देशभक्ती! ‘हे’ पाच चित्रपट आवर्जून बघाच!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Republic Day 2024: बॉलिवूडच्या अभिनेत्रींनीही मोठ्या पडद्यावर दाखवली देशभक्ती! ‘हे’ पाच चित्रपट आवर्जून बघाच!

Republic Day 2024: बॉलिवूडच्या अभिनेत्रींनीही मोठ्या पडद्यावर दाखवली देशभक्ती! ‘हे’ पाच चित्रपट आवर्जून बघाच!

Jan 24, 2024 12:41 PM IST

Republic Day 2024 Special Movies: यंदा तुम्ही खास अभिनेत्रींनी गाजवलेले देशभक्तीपर चित्रपट बघू शकता. चला तर, एक नजर टाकूया अशाच काही चित्रपटांवर...

Republic Day 2024 Special Movies
Republic Day 2024 Special Movies

Republic Day 2024 Special Movies: यंदाचा प्रजासत्ताक दिन खास असणार आहे. नुकतच रमलल्लाचं स्वागत केल्यानंतर आता देशभरातील नागरिक प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी उत्सुक आहेत. बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यावर देखील देशभक्तीपर चित्रपटांचं वर्चस्व पाहायला मिळतं. या खास दिवशी टीव्हीवर अनेक देशभक्तीपर चित्रपट दाखवले जातात. मात्र, यंदा तुम्ही खास अभिनेत्रींनी गाजवलेले देशभक्तीपर चित्रपट बघू शकता. चला तर, एक नजर टाकूया अशाच काही चित्रपटांवर...

गुंजन सक्सेना: द कारगिल वॉर

‘गुंजन सक्सेना: द कारगिल वॉर’ हा चित्रपट एक बायोपिक आहे. हवाई दलातील महिला अधिकारी गुंजन सक्सेना यांना मानवंदना देणारा चित्रपट मोठ्या पडद्यावर देखील गाजला होता. गुंजन सक्सेना या महिला लष्करी पायलट होती. या चित्रपटात जान्हवी कपूरने गुंजन सक्सेना यांची भूमिका साकारली होती. महिला लष्करी कर्मचार्‍यांच्या बाबतीत सामान्य रूढींना आव्हान देणाऱ्या गुंजन सक्सेना अवघ्या देशाला कशा प्रकारे प्रेरित करतात, हे या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे.

मेरी कॉम

‘मेरी कॉम’ हा देखील एक बायोपिक चित्रपट आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रा हिने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटातून बॉक्सिंग लीजेंड मेरी कॉम यांच्या आयुष्याचे चित्रण करण्यात आले आहे. हा चित्रपट एका अशा महिलेची कहाणी सांगतो जिने सर्व अडचणींशी सामना करून पुरुषांच्या खेळात जगज्जेती बनली.

Manasi Naik: अभिनेत्री मानसी नाईक पुन्हा प्रेमात पडली? नव्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चांना उधाण

नीरजा

सोनम कपूरने ‘नीरजा’ या चित्रपटात एका हवाईसुंदरीची भूमिका साकारली होती. नीरजा भानोत यांच्या आयुष्यावर आधारित हा एक बायोपिक आहे. नीरजा भानोत यांनी एका हायजॅक झालेल्या विमानातून अनेक प्रवाशांचे प्राण वाचवले होते.

राझी

‘राझी’ ही एका अशा भारतीय तरुणीची कथा आहे, जी १९७१च्या भारत-पाक युद्धादरम्यान गुप्त हेर म्हणून काम करण्यासाठी पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्याशी लग्न करते. आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात देशभक्ती, त्याग आणि आपल्या देशाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या स्त्रीच्या शौर्याची कथा आहे.

तेजस

‘तेजस’ या चित्रपटात देखील देशभक्तीची कथा दाखवण्यात आली आहे. एका भारतीय गुप्तहेरला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पकडल्याचेही या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. तर, कंगना त्या गुप्तहेरला वाचवण्यासाठी पुढे येते आणि यानंतर एका मोठ्या ऑपरेशनची तयारी केली जाते. पण, या मिशनमध्ये कंगना रनौत म्हणजेच तेजस गिलच्या मार्गात एकामागून एक अडथळे येत राहतात. यावर मात करून ती कशाप्रकारे पुढे जाते, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

Whats_app_banner