मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Republic day 2023: ‘क्रांती’ ते ‘उरी’; ‘हे’ क्लासिक चित्रपट पाहून साजरा करा यंदाचा प्रजासत्ताक दिन!
Republic day 2023
Republic day 2023

Republic day 2023: ‘क्रांती’ ते ‘उरी’; ‘हे’ क्लासिक चित्रपट पाहून साजरा करा यंदाचा प्रजासत्ताक दिन!

25 January 2023, 15:05 ISTHarshada Bhirvandekar

Movies to Watch on Republic day 2023: देशभक्तीवर आधारित चित्रपटांची चित्रपटसृष्टीत नेहमीच क्रेझ राहिली आहे. अशा विषयावरील चित्रपटांना प्रेक्षकांनीही पसंती दिली आहे.

Movies to Watch on Republic day 2023 : देशभक्तीवर आधारित चित्रपटांची चित्रपटसृष्टीत नेहमीच क्रेझ राहिली आहे. अशा विषयावरील चित्रपटांना प्रेक्षकांनीही पसंती दिली आहे. देशभक्तीपर चित्रपट पाहताना देशप्रेमाची भावना नेहमीच मनात उफाळून येते. मनोज कुमार, शाहरुख खान ते विकी कौशल यांसारख्या अनेक कलाकारांनी देशभक्तीवर आधारित चित्रपटांमध्ये दमदार भूमिका केल्या आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त आज आम्ही तुम्हाला अशाच काही चित्रपटांबद्दल सांगणार आहोत...

ट्रेंडिंग न्यूज

क्रांती

बॉलिवूड कलाकार मनोज कुमार, हेमा मालिनी, दिलीप कुमार, शशी कपूर आणि शत्रुघ्न सिन्हा अभिनीत ‘क्रांती’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातील गाणी देशभक्तीच्या भावनेने ओतप्रोत होती. चित्रपटाची कथा सलीम-जावेद यांनी लिहिली होती.

स्वदेस

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘स्वदेश’ हा चित्रपट एक माणूस आपल्या सुखसोयी सोडून आपल्या गावात कसा स्थायिक होतो याचे चित्रण करतो. गावातील लोकांच्या जीवनात प्रकाश यावा म्हणून तो गावात वीज प्रकल्पही उभारतो. या चित्रपटात शाहरुख खान आणि गायत्री जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातून शाहरुख खानने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती.

बॉर्डर

सनी देओल, सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना अभिनीत 'बॉर्डर' हा मल्टीस्टारर चित्रपट जेपी दत्ता यांनी दिग्दर्शित केला होता. भारतीय लष्कराचे शौर्य चित्रपटात दाखवण्यात आले आहे. बॉलिवूडचा हा चित्रपट १९७१ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धावर आधारित होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले होते.

एलओसी : कारगिल

‘एलओसी: कारगिल’ या चित्रपटात संजय दत्त, अजय देवगण, सैफ अली खान, करीना कपूर, राणी मुखर्जी, सुनील शेट्टी, संजय कपूर, अभिषेक बच्चन आणि अक्षय खन्ना अशी तगडी स्टारकास्ट होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन जेपी दत्ता यांनी केले होते. हा चित्रपट कारगिलच्या युद्धावर आधारित होता.

उरी: द सर्जिकल स्ट्राईक

२०१६ मध्ये दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये असलेल्या भारतीय लष्कराच्या स्थानिक मुख्यालयावर हल्ला केला. या हल्ल्यात लष्कराचे सुमारे १८ जवान शहीद झाले होते. यानंतर ११ दिवसांनी भारतीय लष्कराने पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे अनेक ठिकाणे उद्ध्वस्त केले. याच घटनेवर दिग्दर्शक आदित्य धर यांचा 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' हा चित्रपट बनवण्यात आला होता. या चित्रपटात विकी कौशल, यामी गौतम, परेश रावल यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

विभाग