बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रेखा नेहमीच तिच्या लूक आणि सौंदर्यामुळे चर्चेत असते. ती जिथे जाते तिथे आकर्षण ठरते. रेखाला पाहिल्यानंतर चाहत्यांच्या मनावर एक वेगळीच जादू होत असल्याचे पाहायला मिळते. पण रेखाकडे पाहिले तर ती ६९ वर्षांची आहे असे जाणावरणार ही नाही. कारण रेखाचा फॅशन सेन्स हा एका तरुण अभिनेत्रीलाही टक्कर देईल असा असतो. सध्या सोशल मीडियावर रेखाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
आयफा पुरस्कार यंदा अबू धाबी येथे होणार आहे. या अवॉर्ड शोचा भाग होण्यासाठी देशातील सर्व स्टार्स तिथे पोहोचत आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रेखाही मुंबईहून तिकडे रवाना झाल्या आहेत. अशातच रेखा विमानतळावर दिसली. विमानतळावर प्रवेश करताच सर्वजण त्याच्याकडे पाहत होते. कारण रेखाचा लूक हा सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत होता.
रेखाने 'खून भरी मांग' या चित्रपटात केलेला सेमटू सेम लूक केला असल्याचे दिसत आहे. डोक्यावर स्कार्फ, लाल रंगाची लिपस्टिक आणि डोळ्याला मोठा गॉगल. तसेच रेखाने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या लूकमध्ये रेखा अतिशय सुंदर दिसत आहे. पुन्हा एकदा रेखाला पाहून लोकांना त्यांच्या ८० च्या दशकातील अभिनेत्रीची आठवण झाली. या दरम्यानचा रेखाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
रेखाचा हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. चाहतेही यावर कमेंट करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. त्यांनी रेखाच्या सौंदर्याचे भरभरुन कौतुक केले आहे. रेखाच्या व्हिडीओवर एका यूजरने कमेंट करत, 'हा लूक पाहून मला खून भरी मांग या चित्रपटाची आठवण झाली' असे म्हटले. तर दुसऱ्या एका यूजरने 'सर्वात आयकॉनिक महिला' असे म्हणत रेखाच्या सौंदर्याचे कौतुक केले. तिसऱ्या एका यूजरने, 'रेखा ही पॅरिसमध्ये दिसणाऱ्या ऐश्वर्या पेक्षाही सुंदर दिसत आहेत' असे म्हणत सर्वांचे लक्ष वेधले आहे. यापूर्वी रेखाचा अनंत अंबानीच्या लग्नातील लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. त्यानंतर आता विमानतळावरील हा व्हिडीओ आणि त्यामधील रेखाचा लूक हा सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.