Rekha Video: बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा जिथे जाते तिथे सगळी लाइमलाइट लुटते. प्रत्येक कार्यक्रमाला त्यांच्या येण्याने चार चाँद लावले जातात. अशातच रेखा बॉलिवूडचे शोमॅन राज कपूर यांच्या 100 व्या वाढदिवसाला पोहोचली. कपूर कुटुंबीयांनी राज कपूर यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली. रेखा या कार्यक्रमाला उपस्थित होती. या कार्यक्रमात रेखा अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाला भेटली. त्याला मिठी मारली. रेखाचा मिठी मारतानाचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.
राज कपूर यांच्या १०० व्या जयंतीचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या कार्यक्रमात रेखा यांनी अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाची भेट घेतली. अगस्त्याला पाहून रेखा स्वत:ला रोखू शकली नाही आणि त्यांनी त्याला कडकडून मिठी मारली. त्याचबरोबर अगस्त्यनेही रेखाचा पूर्ण आदर केला. तो रेखाला हात जोडून प्रणाम करताना दिसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच व्हायरल झाला आहे. नेटकरी या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स करताना दिसत आहेत.
रेखा आणि अगस्त्य नंदा यांच्या या प्रेमाने भरलेल्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे. यावर कमेंट करण्यापासून चाहते स्वत:ला रोखू शकत नाहीत. एका युजरने कमेंट केली की, "अगस्त्य नंदा खूप सुसंस्कृत मुलगा आहे." आणखी एका युजरने मजेशीर अंदाजात लिहिले की, "घरी जा जया आजी वाट पाहत असेल." तिसऱ्या एका यूजरने जया बच्चन यांची प्रतिक्रिया काय असेल हे सागंण्याचा प्रयत्न केला आहे. 'हा व्हिडीओ पाहून जया यांना थंडी भरली असेल' असे मजेशीर अंदाजात म्हटले आहे.
वाचा: महेश कोठारेंनी शरद तळवकरांना दिली होती 'धुमधडाका' सिनेमातून काढून टाकण्याची धमकी, काय होते कारण?
राज कपूर हे लोकप्रिय अभिनेते-दिग्दर्शक होते, त्यांनी भारतीय सिनेमात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांचे चित्रपट आजही सिनेरसिकांचे मनोरंजन करतात. राज कपूर यांच्या १००व्या जयंती निमित्ताने आरके फिल्म फेस्टिव्हल आयोजित करण्यात आले होते. या फेस्टिवलमध्ये प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक राज कपूर यांचे चित्रपट पीव्हीआरमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्यात आले. या प्रिमिअरला बॉलिवूडमधील जवळपास सर्वच कलाकारांनी हजेरी लावली.
संबंधित बातम्या