मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  18+ Movies: 'हे' सिनेमे कुटुंबीयांसोबत पाहण्याची हिंमत करु नका

18+ Movies: 'हे' सिनेमे कुटुंबीयांसोबत पाहण्याची हिंमत करु नका

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 15, 2024 05:24 PM IST

18+ Movies List: ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या 18+ चित्रपटांची यादी इथे वाचा...

18+ Movies
18+ Movies

आजकाल घरबसल्या अनेक चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांची मागणी असते. त्यासाठी वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. हॉलिवूडमध्ये 18+ अनेक चित्रपट आहेत. हे चित्रपट कुटुंबीयांसोबत पाहण्याची हिंमत करु नका. आता हे चित्रपट कोणते? चला पाहूया...

रॉब कोहेन दिग्दर्शित आणि बार्बरा करी लिखित 'द बॉय नेक्ट डोअर' हा चित्रपट २०१५मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात जेनिफर लोपेझ, रायन गुझमन आणि इयान नेल्सन असून जॉन कॉर्बेट आणि क्रिस्टिन चेनोवेथ हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
वाचा: आयराच्या रिसेप्शनमध्ये जया बच्चनने सोनाली बेंद्रेकडे केले दुर्लक्ष Video viral

क्युरिओसा हा लू ज्युनेट दिग्दर्शित २०१९मध्ये प्रदर्शित झालेला चरित्रपट आहे. या चित्रपटात नोमी मर्लांट, नील्स श्नाइडर आणि बेंजामिन लॅव्हर्न्हे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट लेखक पियरे लुइस आणि मेरी डी रेग्नियर यांच्या प्रेमसंबंधांवर आधारित आहे.

६.९ हा एक ब्रिटीश आर्ट रोमँटिक ड्रामा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन मायकेल विंटरबॉटम यांनी केले आहे. या चित्रपटात किरन ओब्रायन आणि मार्गो स्टिली महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.

ओरिजिनल सीन हा चित्रपट २००१मध्ये प्रदर्शित झालेला अमेरिकन कामुक थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात अँटोनियो बॅंडेरस आणि अँजेलिना जोली यांनी अभिनय केला आहे. हे कॉर्नेल वूलरिचच्या वॉल्ट्झ इनटू डार्कनेस या कादंबरीवर आधारित आहे आणि १९६९ च्या फ्रँकोइस ट्रूफॉट चित्रपट मिसिसिपी मर्मेडचा रिमेक आहे.

इटालियन दिग्दर्शक सिल्व्हिओ सोल्डिनी दिग्दर्शित 'कम अनडन' हा चित्रपट २०१०मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट चुकूनही कुटुंबीयांसोबत पाहण्याची हिंमत करु नका.

WhatsApp channel

विभाग