RD Burman Love Story: ६ वर्षांनी मोठ्या आशा भोसलेंच्या प्रेमात होते आरडी बर्मन, वाचा लव्हस्टोरी-rd burman and asha bhosle love story read here ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  RD Burman Love Story: ६ वर्षांनी मोठ्या आशा भोसलेंच्या प्रेमात होते आरडी बर्मन, वाचा लव्हस्टोरी

RD Burman Love Story: ६ वर्षांनी मोठ्या आशा भोसलेंच्या प्रेमात होते आरडी बर्मन, वाचा लव्हस्टोरी

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 04, 2024 08:26 AM IST

RD Burman and Asha Bhosle Love story: आपल्या बहारदार संगीताने रसिक श्रोत्यांच्या मनावर राज्य करणारे पंचम दा स्वतःचं हृदय मात्र लोकप्रिय गायिका आशा भोसले यांना देऊन बसले होते.

RD Burman and Asha Bhosle
RD Burman and Asha Bhosle

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट संगीतकार आर. डी. बर्मन यांनी संगीताला नवीन परिभाषा दिली. आपल्या काळाच्या पुढे असणारे पंचमदांचा आज (४ जानेवारी) स्मृतिदिन. त्यांच्या प्रसिद्ध गाण्यांची संगीत रसिकांना चांगलीच जाण आहे.आरडी बर्मन यांना मनोरंजन विश्वात सर्वजण प्रेमाने 'पंचम दा' म्हणत. आपल्या बहारदार संगीताने रसिक श्रोत्यांच्या मनावर राज्य करणारे पंचम दा स्वतःचं हृदय मात्र लोकप्रिय गायिका आशा भोसले यांना देऊन बसले होते.

आशा भोसले आणि आरडी बर्मन यांचे व्यावसायिक नाते जसे फुलत होते, तसेच त्यांचे वैयक्तिक नाते देखील बहरत होते. आशा भोसले यांच्या प्रेमात पडलेल्या आरडी बर्मन यांनी आशा भोसले यांना लग्नाचा प्रस्ताव देखील दिला होता. मात्र, आशा भोसले यांनी तो थेट नाकारला होता. परंतु, आरडी बर्मन मागे हटले नाहीत. त्यांनी आशा भोसले यांचा नकार होकारात बदलायला लावला होता. दोघांची प्रेमकहाणी देखील फिल्मी आहे.
वाचा: यशने केला आरोहीशी साखरपुडा, कांचन आजीने घेता मोठा निर्णय

आरडी बर्मन यांचे पहिले लग्न रिता पटेल यांच्याशी झाले होते. मात्र, काही काळानंतर त्यांचा घटस्फोट झाला. या दरम्यान आरडी बर्मन संगीत क्षेत्रात प्रचंड सक्रिय होते. दुसरीकडे, आशा भोसले यांचे पती गणपतराव भोसले यांचे १९६६मध्ये निधन झाले. यामुळे आशा भोसले देखील एकट्या पडल्या होत्या. आशा भोसले आणि आरडी बर्मन दोघेही आपापलं आयुष्य एकट्याने जगात होते. १९७० दरम्यान आशा भोसले आणि आरडी बर्मा यांची भेट कामाच्या निमित्ताने झाली. आशा भोसले यांच्या अनेक दमदार गाण्यांना आरडी बर्मन यांनी संगीत दिले होते. या जोडीच्या ‘पिया तू अब तो आजा’ आणि ‘दम मारो दम’सारख्या गाण्यांना पुरस्कार देखील मिळाला.

आशा भोसले आणि आरडी बर्मन ही जोडी संगीत क्षेत्रात सुपरहिट ठरू लागली होती. दरम्यान आरडी बर्मन यांनी आशा भोसले यांना लग्नासाठी विचारले. मात्र, आशा भोसले यांनी त्यांच्या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला. आरडी बर्मन हे आशा भोसले यांच्यापेक्षा तब्बल ६ वर्षांनी लहान होते. मात्र, त्यांच्या प्रेमात वयाचं बंधन कधीच आलं नाही. त्या काळात आशा भोसले पती गणपतराव भोसले यांच्या निधनाच्या दुःखातून सावरल्या नव्हत्या. त्यामुळे त्या आरडी बर्मन यांना नकार देत होत्या. मात्र, आरडी बर्मन यांनी आशा भोसलेंकडून होकार मिळवलाच. यात त्यांना लता मंगेशकर यांची देखील मदत मिळाली.

या लग्नाला दोन्ही कुटुंबांकडून काहीसा विरोध झाला. परंतु, प्रेमापुढे त्यांना हार मानवी लागली. अखेर १९८०मध्ये दोघांनी लग्न केले. आशा भोसले यांनी वयाच्या ४७व्या वर्षी आरडी बर्मन यांच्याशी लग्न केले. त्यावेळी आरडी बर्मन वर्षांचे होते. ४ जानेवारी १९९४ रोजी वयाच्या अवघ्या ५४व्या वर्षी आरडी बर्मन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Whats_app_banner
विभाग