मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Madhavi Mahajani: त्यांच्या निधनानंतर घरात परिस्थिती बदलली; रवींद्र महाजनींच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच बोलली पत्नी

Madhavi Mahajani: त्यांच्या निधनानंतर घरात परिस्थिती बदलली; रवींद्र महाजनींच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच बोलली पत्नी

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 01, 2024 08:53 AM IST

Ravindra Mahajani Wife: रवींद्र महाजनींच्या पत्नी माधवी यांनी नुकताच या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. सोबतच प्रकाशित केलेल्या आत्मचरित्र्याविषयी देखील काही गोष्टी सांगितल्या...

Ravindra Mahajani Wife Madhavi
Ravindra Mahajani Wife Madhavi

Ravindra Mahajani Wife Madhavi Mahajani: मराठी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचे गेल्यावर्षी जुलै महिन्यात निधन झाले. पुणे जिल्ह्यातील आंबी गावातील एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह अढळला. जवळपास तीन दिवस त्यांचा मृतदेह घरात पडून होता. रवींद्र महाजनी यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. आता जवळपास त्यांच्या निधनाच्या सहा महिन्यांनंनतर पत्नी माधवी महाजनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पतीच्या जीवनावर आत्मचरित्र लिहिले आहे.

माधवी महाजनी यांनी रवींद्र यांचे आत्मचरित्र प्रकाशित केले आहे. त्यांनी या पुस्तकाचे नाव 'चौथा अंक' असे ठेवले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी देखील उपस्थित होता. दरम्यान, या सोहळ्यात त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आणि पहिल्यांदाच पतीच्या निधनावर प्रतिक्रिया दिली.
वाचा: त्याने माझा हात हातात घेऊन...; सायली संजीवने सांगितला होता शाहरुखच्या भेटीचा किस्सा

‘एबीपी माझा’शी संवाद साधताना माधवी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. “आयुष्यात खूप घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे सगळेच सांगणे कठीण होते. त्यानंतर जवळचे नातेवाईक व माझ्या काही मैत्रिणींनी हे पुस्तक लिहिण्याचा आग्रह मला केला. सुरुवातीला मी तयार नव्हते पण, प्रेक्षकांसमोर मोकळे व्हावे असे मलाही जाणवले. या पुस्तकातून माझा कुणालाही नायक किंवा व्हिलन बनवायचा हेतू नाही. जे माझ्या आयुष्यात खरे खरे घडले ते सर्व मी लिहून काढले आहे” असे माधवी महाजन म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या की, “पुस्तकात जर काही गोष्टी लपवल्या असत्या, तर ते आत्मचरित्र झाले नसते. फक्त चांगल्या घटना लिहायच्या असत्या, तर ती कादंबरी झाली असती. त्यामुळे मी सगळ्या खऱ्या घटना लिहिल्या आहेत. पण, यामागे माझा हेतू अगदी चांगला आहे. माझे दोष, त्यांचे दोष या सगळ्या गोष्टी मी चांगल्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माझे हे पुस्तक फार आधीच लिहून झाले होते. पुस्तक छापायला मी देणार होते. पण, त्याआधीच त्यांचे निधन झाले. त्यानंतर माझ्या जवळच्या लोकांनी माझ्या विचारांना आणखी दिशा दिली. पुढे, मी पुस्तकात त्यांच्या निधनानंतर घरात बदललेली परिस्थिती व त्यानंतरचे माझे विचार या गोष्टी देखील लिहिल्या.”

WhatsApp channel

विभाग