Ravi Teja: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्यावर झाली शस्त्रक्रिया, वाचा प्रकृतीविषयी-ravi teja discharged from hospital after successful surgery of muscle ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ravi Teja: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्यावर झाली शस्त्रक्रिया, वाचा प्रकृतीविषयी

Ravi Teja: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्यावर झाली शस्त्रक्रिया, वाचा प्रकृतीविषयी

Aarti Vilas Borade HT Marathi
Aug 25, 2024 09:03 AM IST

Ravi Teja Health Update: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता रवी तेजावर मोठी शस्त्रक्रिया झाली आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे.

Ravi Teja
Ravi Teja

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता रवी तेजा सध्या चर्चेत आहे. त्याची मोठी सर्जरी झाल्याची माहिती समोर आली आहे. आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना त्याला दुखापत झाली. अभिनेत्याने त्याकडे दुर्लक्ष केले आणि चित्रीकरण पूर्ण केले. त्यामुळे झालेली दुखापत ही वाढली. डॉक्टरांनी ती दुखापत पाहिल्यावर थेट सर्जरी करण्याचा सल्ला दिला. आता रवीची सर्जरी झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या रवीची प्रकृती देखील स्थिर आहे.

रवीला नेमके काय झाले?

रवी त्याचा आगामी चित्रपट 'RT75'चे चित्रीकरण करत होता. चित्रीकरणादरम्यान, अभिनेत्याच्या उजव्या हाताच्या स्नायूंवर ताण आला. सुरुवातीला रवीने त्याकडे दुर्लक्ष केले. त्याने काम करणे सुरू ठेवल्याने, दुखापत आणखीनच वाढली, त्यामुळे शस्त्रक्रिया करणे भाग पडले. २४ ऑगस्ट रोजी, रवी तेजाने त्याच्या चाहत्यांना त्याच्या आरोग्याच्या स्थितीबद्दल अपडेट करण्यासाठी सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे.

काय आहे रवीची पोस्ट?

रवीने त्याच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने, "सुरळीत शस्त्रक्रियेनंतर यशस्वीरित्या डिस्चार्ज मिळाला आहे आणि आता मला बरे वाटत आहे. तुमच्या सर्व प्रेमळ आशीर्वाद आणि पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञ आहे. लवकरच सेटवर परत येण्यास मी उत्सुक आहे" असे म्हटले आहे. ही पोस्ट करत त्याने चाहत्यांना प्रकृती सुधारत असून लवकरच कामावर परतणार असल्याचे म्हटले आहे.

रवीने एक निवेदनही जारी केले आहे. या निवेदनामध्ये रवी तेजाला चित्रीकरण सुरु असताना झालेल्या त्रासाविषयी माहिती देण्यात आली आहे. "मास महाराजा रवितेजाला नुकताच #RT75 च्या चित्रीकरणादरम्यान उजव्या हाताचे स्नायू फाटले. दुखापत असूनही, त्याने शूट करणे सुरूच ठेवले, ज्यामुळे दुर्दैवाने आणखी वाढ झाली. काल यशोदा हॉस्पिटल येथे त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, त्याला पूर्ण बरे होण्यासाठी सहा आठवडे विश्रांती करण्यात सांगण्यात आली आहे” असे त्या निवेदनात म्हटले आहे.
वाचा: अरबाज खानचा मुलगा अरहान सावत्र आईसोबत फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, दोघांमधील नाते पाहून नेटकरी खूश

'RT75' चित्रपटाविषयी

'RT75' हा चित्रपट रवी तेजासाठी फार महत्त्वाचा आहे. कारण त्याच्या करिअरमधील हा ७५वा चित्रपट आहे. या चित्रपटात रवीसोबत अभिनेत्री श्रीलीला मुख्य भूमिकेत आहे आणि हा चित्रपट नवोदित भानू भोगावरपू दिग्दर्शित करत आहे. संक्रातीला हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. रवी तेजा शेवटचा मिस्टर बच्चनमध्ये दिसला होता, जो 15 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये आला होता. या चित्रपटात भाग्यश्री बोरसे आणि जगपती बाबू मुख्य भूमिकेत दिसले. हा अधिकृत तेलगू रिमेक आहे मूळचा अजय देवगण अभिनीत असलेला हिंदी ब्लॉकबस्टर रेड.

विभाग