एकेकाळी बॉलिवूडवर अधिराज्य करणारी जोडी म्हणजे रवीना टंडन आणि अक्षय कुमार. पण गेल्या कित्येक वर्षात ते दोघे एकत्र दिसले नाहीत. आता जवळपास २४ वर्षांनंतर ही जोडी 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटात झळकणार आहे. अशातच रवीनाची जुनी मुलाखत सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या मुलाखतीत रवीना तिच्या आणि अक्षयच्या तुटलेल्या साखरपुड्यावर वक्तव्य केले आहे.
१९९४ साली 'मोहरा' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अक्षय कुमार आणि रवीना टंडन हे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. हा चित्रपट त्या वेळी सुपरहिट ठरला होता. चित्रपटानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढू लागल्या होत्या. काही काळ दोघांनी एकमेकांना डेट केल्यानंतर साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला. घरच्यांच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा पार पडला होता. पण १९९८ मध्ये असे काही घडले की दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांचा साखरपुडा मोडण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
गेल्या वर्षी एका पॉडकास्टदरम्यान एएनआय या वृत्तसंस्थेने रवीनाला तिच्या आणि अक्षय कुमारच्या तुटलेल्या साखरपुड्याबद्दल विचारले होते. सुरुवातीला रवीना म्हणाली की, तिचा आणि अक्षयचा साखरपुडा झाला आहे हे ती स्वत: विसरली आहे. 'मोहरा चित्रपटाच्या वेळी आमची जोडी हिट ठरली होती. आजही एखाद्या कार्यक्रमात आपण एकमेकांना भेटलो तर चांगले बोलतो. सगळे पुढे जातात. महाविद्यालयीन मुली तर दर आठवड्याला बॉयफ्रेंड बदलतात. पण तुटलेला हा साखरपुडा अजूनही तुमच्या मनात आहे का माहित नाही. सगळे पुढे जातात, लोक घटस्फोट घेतात, पुढे जातात. यात काय मोठी गोष्ट आहे का?' असे रवीना म्हणाली.
वाचा: पुढच्या वर्षी अभिनेत्री सायली संजीव करणार लग्न? रक्षाबंधनानिमित्त शेअर केलेल्या व्हिडीओची चर्चा
रवीनने अक्षय कुमारसोबत साखरपुडा मोडल्यानंतर काही काळ स्वत:ला दिला. तिने या कठीण काळात बराच विचार केला. त्यानंतर जवळपास सहा वर्षांनी चित्रपट निर्माते अनिल थडानी यांच्या सोबत तिने लग्न केले. त्यांना आता एक मुलगी आहे. तिचे नाव राशा असे आहे. तर अक्षय कुमारने २००१ मध्ये अभिनेत्री ट्विंकल खन्नाशी लग्न केले. अक्षयला दोन मुले आहेत. मुलीचे नाव नितारा आहे तर मुलाचे नाव आरव असे आहे. पण आता जवळपास २४-२५ वर्षांनंतर रवीना आणि अक्षय पुन्हा एकत्र चित्रपटात दिसणार असल्यामुळे चाहते उत्सुक झाले आहेत.
संबंधित बातम्या