Raveena Tandon: तर माझे करिअर संपले असते; लग्नाआधीच आई झाल्यामुळे घाबरली होती रविना टंडन
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Raveena Tandon: तर माझे करिअर संपले असते; लग्नाआधीच आई झाल्यामुळे घाबरली होती रविना टंडन

Raveena Tandon: तर माझे करिअर संपले असते; लग्नाआधीच आई झाल्यामुळे घाबरली होती रविना टंडन

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Oct 26, 2024 07:41 AM IST

Raveena Tandon Birthday: रविना टंडनने एका मुलाखतीमध्ये करिअरच्या सुरुवातीच्या काळाविषयी सांगितले. ती वयाच्या २१व्या वर्षी आई झाली होती. पण तिने दहा वर्षे ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली होती.

Raveena Tandon
Raveena Tandon (Instagram/@officialraveenatandon)

बॉलिवूडची 'टीप टीप बरसा गर्ल' म्हणून रविना टंडन ओळखली जाते. तिने बॉलिवूडमध्ये अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. चित्रपटांमधील शानदान परफॉर्मंन्स आणि पारंपरिक भूमिकांनी रविना विशेष ओळखली जाते. पण ९०च्या दशकात चित्रपटांसोबतच रविना तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत होती. आज २६ ऑक्टोबर रोजी रविनाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...

आपल्या सौंदर्याने घायाळ करणारी रविनी तिचा ५०वा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा करत आहे. तिने कुटुंबीय आणि मित्र परिवाला पार्टीचे आमंत्रण दिले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का लाखो चाहत्यांना भूरळ घालणारी रविना वयाच्या २१व्या वर्षी दोन मुलींची आई झाली आहे. तिच्या या दोन्ही मुलींची लग्न देखील झाले आहेत. पण रविनाने मुलींची दहावी होई पर्यंत त्यांना मीडियापासून लांब ठेवले होते. मात्र, मुली मोठ्या झाल्यावर रविनाने याबाबत माहिती दिली.

१९९५ साली दोन मुलींना घेतले दत्तक

बॉलिवूडची 'मस्त मस्त गर्ल' म्ह्णून ओळखल्या जाणाऱ्या रविनाने वयाच्या २१ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. चित्रपटांमध्ये यश मिळाल्यानंतर करियरवर लक्ष देत रवीनाने दोन मुलींना दत्तक घेतले. १९९५ साली रविनाने दोन मुलींना दत्तक घेतले. छाया टंडन आणि पूजा टंडन. त्यावेळेस पूजा केवळ ११ वर्षांची होती तर छाया फक्त ८ वर्षांची होती. त्यावेळेस रविनाने एकटीने या दोन्ही मुलींचा सांभाळ केला. दोन्ही मुलींची दहावी पूर्ण होईपर्यंत रवीनाने ही गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. त्यानंतर मात्र रविना दोघींनाही चित्रपटाच्या सेटवर नेऊ लागली. त्यावेळेस मात्र ही गोष्ट फार काळ लपून राहू शकली नाही. त्यानंतर रविनाने सगळ्यांना तिच्या मुलींची ओळख करून दिली.

तर माझे करिअर संपले असते

एका मुलाखतीत रविनाने मुलींना दत्तक घेण्याबद्दल खुलासा केला होता. रविना म्हणाली, 'मी लक्षपूर्वक माझ्या दोन्ही मुलींना समाजापासून दूर ठेवले. तेव्हाचा काळ वेगळा होता. माझ्या मुलींबद्दल कळताच त्यांनी मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले असते. अचानक मुले कुठून आली. काहीतरी घोळ आहे. कुणाचे बाळ आहे. असे अनेक प्रश्न उभे राहिले असते. तेव्हा पत्रकारितादेखील इतकी चांगली नव्हती. त्यांनी मला नकारात्मक पद्धतीने प्रेक्षकांसमोर दाखवले असते तर माझे करिअर संपले असते. मात्र मी हळूहळू धाडस करून त्यांना माझ्या मुलींबद्दल सांगितले.'
वाचा: नगरसेवकाने फसवून केले होते ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीशी लग्न, पहिल्या पत्नीने समोर आणले सत्य

२००४ साली रविनाने उद्योगपती अनिल थडानीशी लग्न केले. लग्नानंतर रवीनाला एक मुलगा आणि एक मुलगी झाली. आज रवीना चार मुलांची आई आहे. मात्र २१ व्या वर्षी रवीनाने घेतलेल्या निर्णयाने तिला चाहत्यांच्या नजरेत हिरो बनवले.

Whats_app_banner