
Ratna Pathak Birthday Special: मनोरंजन विश्वात आतापर्यंत अनेक हिंदू-मुस्लिम अभिनेते-अभिनेत्रींनी एकमेकांशी लग्नगाठ बांधली आहे. यामध्ये कोणी हिंदू विधीनुसार सात फेरे घेतले, तर कुणी निकाहनामा वाचून लग्न केलं. पण, हिंदी चित्रपटसृष्टीत एक जोडपं असं आहे की, ज्यांनी ना निकाहनामा वाचाल, ना सात फेरे घेतले, ना कोणता समारंभ आयोजित केला. मग, यांचे लग्न नेमके कसे झाले? ही जोडी आहे बॉलिवूड अभिनेत्री रत्ना पाठक आणि अभिनेते नसीरुद्दीन शाह. अभिनेत्री रत्ना पाठक आणि अभिनेता नसीरुद्दीन शाह यांचे लग्न कसे झाले, ते जाणून घेऊया...
नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक यांची पहिली भेट १९७५ साली झाली होती. त्यावेळी नसीरुद्दीन शाह एफटीआयआयमधून पदवी शिक्षण घेत होते. तर, रत्ना कॉलेजमध्ये शिकत होत्या. दोघेही कॉलेजमध्ये शिकत असतानाच एक नाटक करू लागले होते. दोघांना या नाटकाच्या ऑडिशनसाठी बोलावण्यात आले होते, हा विशेष योगायोग आहे. सत्यदेव दुबे यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या नाटकाच्या रिहर्सलमध्ये दोघेही पहिल्यांदाच एकमेकांना भेटले होते. पहिल्या भेटीतच दोघांची एकमेकांशी चांगली ओळख झाली. पण, त्यांचे हे पहिल्या नजरेतले प्रेम नव्हते. पहिल्याच भेटीच्या दुसऱ्या दिवशी नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक एकर फिरायला देखील गेले होते.
या नाटकाच्या तालमीदरम्यान त्यांच्यातील मैत्री हळूहळू वाढली. यानंतर त्यांच्या भेटीगाठींचा सिलसिला वाढू लागला आणि मग ते एकमेकांच्या प्रेमात पडले. नसीरुद्दीन शाह यांची रत्ना पाठक यांच्यासोबत भेट झाली, तेव्हा त्यांचा पहिली पत्नी परवीन मुराद (मनारा सिक्री) हिच्यासोबत घटस्फोट झाला होता. प्रेमाची जाणीव झाल्यावर त्यांनी एकमेकांवरील प्रेम व्यक्त केले. यानंतर दोघेही काही वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले आणि त्यानंतर १ एप्रिल १९८२ रोजी अतिशय रोमँटिक पद्धतीने लग्न केले.
रत्ना पाठक आणि नसीरुद्दीन शाह यांचा लग्न सोहळा फार मोठा किंवा आलिशान नव्हता. अगदी साध्या पद्धतीने त्यांचे लग्न पार पडले होते. मात्र, दोघांनाही सात फेरे घेतले नाहीत किंवा निकाहही केला नाही. दोघांनी रत्ना यांच्या आई दिना पाठक यांच्या उपस्थितीत कोर्टात लग्न केले. या कोर्ट मॅरेजमध्ये वधू आणि वराने खूप धमाल केली होती. लग्न झाल्यानंतर त्यांनी बीचवर रोमँटिक क्षण घालवले. दोघेही पोहायला गेले आणि त्यांनी ड्रिंक्सचा आनंद घेतला. सात फेरे, निकाहनामा किंवा पाठवणी अशा सगळ्या पारंपारिक विधींना त्यांनी नकार दिला.
संबंधित बातम्या
