रतन टाटा यांनी निर्मिती केलेला बॉलिवूड सिनेमा कोणता? बिग बी मुख्य भूमिकेत असून ठरला होता फ्लॉप
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  रतन टाटा यांनी निर्मिती केलेला बॉलिवूड सिनेमा कोणता? बिग बी मुख्य भूमिकेत असून ठरला होता फ्लॉप

रतन टाटा यांनी निर्मिती केलेला बॉलिवूड सिनेमा कोणता? बिग बी मुख्य भूमिकेत असून ठरला होता फ्लॉप

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Oct 08, 2024 09:02 PM IST

Guess the Movie: उद्योगपती रतन टाटा यांनी एकेकाळी चित्रपटांच्या व्यवसायात नशीब आजमावले होते. त्यांनी एका चित्रपटाची निर्मितीही केली, पण तो चित्रपट फ्लॉप झाला. आता चित्रपट कोणता? चला जाणून घेऊया...

अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन

उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी २००४ मध्ये एका चित्रपटाची निर्मिती केली होती. या रोमँटिक सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली होती. तर जॉन अब्राहम आणि बिपाशा बसू महत्त्वाच्या भूमिकेत होते. अमिताभ आणि रतन टाटांसारखी मोठी नावे असूनही हा चित्रपट चालला नाही. या सिनेमाचं नाव तुम्हाला माहीत आहे का? या चित्रपटाचे नाव आणि त्याच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

काय आहे चित्रपटाचे नाव आणि बजेट?

'ऐतबार' असं या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट ९.५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर केवळ ४.५० कोटी रुपयांची कमाई केली. तर जगभरात चित्रपटाने ७.९६ कोटी रुपये कमावले. म्हणजे चित्रपटाला त्याचा खर्चही वसूल करता आला नाही.

रतन टाटा यांनी घेतला मोठा निर्णय

'ऐतबार' चित्रपट सुपर फ्लॉप झाल्याने रतन टाटा यांना मोठा फटका बसला होता. तेव्हा त्यांना सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. त्यामुळे रतन टाटा यांनी चित्रपटसृष्टीतून माघार घेतली. या चित्रपटानंतर त्यांनी कधीही कोणत्याही चित्रपटात गुंतवणूक केली नाही. त्यांनी या इंडस्ट्रीमध्ये कधीही पुन्हा पाय टाकायचे नाही असा विचार केला.
वाचा: पहिल्या पत्नीला दागिन्यांसह दिला अग्नी, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या पत्नीविषयी माहिती आहे का?

'ऐतबार' चित्रपटाविषयी

'ऐतबार' हा चित्रपट १९९६ मध्ये आलेल्या 'फियर' या अमेरिकन चित्रपटापासून प्रेरित होता. आपल्या मुलीला वाचवण्यासाठी प्रत्येक मर्यादा ओलांडणाऱ्या बापाची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी डॉ. रणवीर मल्होत्रा, बिपाशा बसूने त्यांची मुलगी रिया मल्होत्रा आणि जॉन अब्राहमने रियाच्या वेड्या प्रियकराची भूमिका साकारली होती. चित्रपटाचे बजेट खूप हाय होते. मात्र, चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नसल्यामुळे निर्मात्यांचे खूप मोठे नुकसान झाले होते.

Whats_app_banner