मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडीओ बनवणाऱ्या आरोपीला अटक, अभिनेत्रीने मानले पोलिसांचे आभार!

Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडीओ बनवणाऱ्या आरोपीला अटक, अभिनेत्रीने मानले पोलिसांचे आभार!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 21, 2024 11:12 AM IST

Rashmika Mandanna Deepfake Video: अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडीओ तयार करणाऱ्या व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

Rashmika Mandanna Deepfake Video
Rashmika Mandanna Deepfake Video

Rashmika Mandanna Deepfake Video: बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणात आता पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. अभिनेत्रीचा डीपफेक व्हिडीओ तयार करणाऱ्या व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अभिनेत्रीने पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दाखल केली होती. आता दिल्ली पोलिसांच्या या यशावर रश्मिका मंदानाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिने दिल्ली पोलिसांचे आभार मानत, चाहत्यांना अशा गोष्टींपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

रश्मिका मंदानाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून दिल्ली पोलिसांचे आभार मानले आहेत. रश्मिकाने तिच्या अकाऊंटवर एक नोट शेअर केली आहे, ज्यात तिने लिहिले आहे की, 'या प्रकरणातील आरोपींना अटक केल्याबद्दल मी दिल्ली पोलिसांचे खूप आभारी आहे. या कठीण काळात माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या आणि मला मदत करणाऱ्या सर्व लोकांचे मी मनापासून आभार व्यक्त करू इच्छिते.’ तर, आपल्या चाहत्यांना सावध करताना अभिनेत्रीने पुढे लिहिले की, 'सर्व तरुण मुला-मुलींनी याकडे अतिशय काळजीपूर्व लक्ष दिले पाहिजे. जर, तुमच्या परवानगीशिवाय फोटोचा वापर कोणत्याही प्रकारे प्रतिमा खराब करण्यासाठी केला जात असेल, तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. अशा वेळी तुमची साथ देणारं आणि तुम्हाला सर्व प्रकारे मदत करणारं कुणीतरी आहे, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे.’

695 Review: अयोध्येतील राम मंदिराची ५०० वर्षांची संघर्ष कथा! नेमका काय आहे ‘६९५’ चित्रपट? वाचा...

बॉलिवूड सध्या या डीपफेक व्हिडीओंच शिकार बनत चाललं आहे. रश्मिका मंदानाच नाही तर, अनेक बॉलिवूड अभिनेत्रींचे डीपफेक व्हिडीओ समोर आले आहेत. आलिया भट्ट, काजोल, नोरा फतेही यांचे डीपफेक व्हिडीओ आणि फोटोही इंटरनेट, सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता मात्र, सर्व सेलिब्रिटींनी हे प्रकरण गांभीर्याने घेत त्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सध्या रश्मिका तिच्या शूटिंगमध्ये खूप व्यस्त आहे. 'अ‍ॅनिमल'च्या शानदार यशानंतर, रश्मिकाने आता 'पुष्पा २’ म्हणजेच ‘पुष्पा: द रुल'ची तयारी सुरू केली आहे. सध्या ती चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर हा चित्रपट यावर्षी १५ ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून रश्मिका मंदाना तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अशी चर्चा सुरू होती की, रश्मिका विजय देवराकोंडासोबत फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा करणार आहे. मात्र, अभिनेता विजयने याला अफवा म्हटले आहे.

WhatsApp channel