घराचं भाडे ते लेकीच्या खेळण्यांसाठीही पैसे नव्हते, रश्मिका मंदाना कशी बनली नॅशनल क्रश
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  घराचं भाडे ते लेकीच्या खेळण्यांसाठीही पैसे नव्हते, रश्मिका मंदाना कशी बनली नॅशनल क्रश

घराचं भाडे ते लेकीच्या खेळण्यांसाठीही पैसे नव्हते, रश्मिका मंदाना कशी बनली नॅशनल क्रश

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 05, 2024 08:09 AM IST

आज ५ एप्रिल रोजी रश्मिका मंदाना हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया इतक्या गरीब घरातून आलेली रश्मिका नॅशनल क्रश कशी बनवली.

घराचं भाडे ते लेकीच्या खेळण्यांसाठीही पैसे नव्हते, रश्मिका मंदाना कशी बनली नॅशनल क्रश
घराचं भाडे ते लेकीच्या खेळण्यांसाठीही पैसे नव्हते, रश्मिका मंदाना कशी बनली नॅशनल क्रश (Instagram/@rashmika_mandanna)

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय क्यूट आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून रश्मिका मंदाना ओळखली जाते. तिची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली आहे. आज रश्मिका नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते. तिचा चाहता वर्ग अतिशय मोठा आहे. केवळ भारतातच नव्हे तर सातासमुद्रापारही तिचे चाहते आहेत. आज ५ एप्रिल रोजी रश्मिकाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या विषयी काही खास गोष्टी...

स्टायलिस्ट अभिनेत्रींच्या यादीमध्ये नाव

रश्मिका अतिशय सुंदर आणि स्टायलिस्ट अभिनेत्री आहे. ती सतत तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. तिने तमिळ, कन्नड आणि तेलुगू भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने सिद्धार्थ मल्होत्राच्या मिशन मजनू या शंतनू बागची दिग्दर्शित चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती रणबीर कपूरसोबत 'अॅनिमल' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसली.
वाचा: २० वर्षांत बायकोला किती पैठण्या दिल्या?; आदेश बांदेकर यांनी दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष

एक काळ असा होता की रश्मिकाच्या आई-वडिलांकडे घराचे भाडे देण्यासाठी, तसेच रश्मिकाला लहानपणी खेळणी घेण्यासाठी पैसे नव्हते. रश्मिकाने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलासा केला होता. रश्मिकाच्या आयुष्यातला एक काळ असा होता जेव्हा तिच्या आई-वडिलांना घर मिळवण्यासाठीही संघर्ष करावा लागला होता. त्यांच्याकडे घराचे भाडे द्यायलाही पैसे नव्हते. परिस्थिती इतकी वाईट होती की ते आपल्या मुलीसाठी एक खेळणे देखील विकत घेऊ शकत नव्हते. बालपणीची ही गरिबी पाहून आज रश्मिका कष्टातून कमावलेल्या पैशांना फार महत्त्व देते.
वाचा: मी जास्तीत जास्त २ हजार रुपये खर्च करते; कपड्यांवर वायफळ खर्च करण्यावर मृणाल ठाकूरची प्रतिक्रिया

खासगी आयुष्यामुळे डिप्रेशनमध्ये

रश्मिकाला २०१८ साली प्रदर्शित झालेल्या चलो या चित्रपटाने खरी प्रसिद्धी मिळवून दिली. त्यापूर्वी २०१६ मध्ये रश्मिकाचा साखरपुडा झाला होता. रक्षित शेट्टी असे त्या अभिनेत्याचे नाव होते. रक्षित जवळपास १३ वर्षांनी रश्मिकापेक्षा मोठा होता. त्यांचे नाते जेव्हा तुटले तेव्हा रश्मिकावर याचा मोठा परिणाम झाला. ती डिप्रेशनमध्ये गेली होती.

वाचा: चला हवा येऊ द्या आमच्यासाठी भावनिक शो; ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’चा प्रोमो पाहून नेटकरी भावूक

रश्मिकाने महाविद्यालयात शिक्षण घेत असताना मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली आणि त्यादरम्यान तिने काही ब्रँडसाठी देखील कामही केले. तिने २०१४ मध्ये क्लीन अँड क्लियर टाइम्स फ्रेश फेस ऑफ इंडिया हा किताब जिंकला. हे विजेतेपद तिच्या कारकिर्दीला कलाटणी देणारे ठरले. वयाच्या १९ व्या वर्षी रश्मिकाने तिचा पहिला चित्रपट किरिक पार्टी साइन केला.

Whats_app_banner