दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदानाहिने जिममध्ये पायाला दुखापत झाल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. तिने या पोस्टमध्ये नेमकं काय झालं याविषयी माहिती देत एका चित्रपट निर्मातीची माफी मागितली आहे. आता रश्मिकाने माफी का मागितली आहे? नेमकं कारण तरी काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...
रश्मिकाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खुर्चीवर बसलेली दिसत आहे. तसेच समोर ठेवलेल्या टेबलावर तिने फ्रॅक्चर असलेला पाय ठेवला आहे. कॅमेऱ्याला पोज देताना अभिनेत्रीने वेगवेगळे एक्सप्रेशन दिले. या फोटोंमध्ये रश्मिका शर्ट आणि ट्राऊझर परिधान केल्याचे दिसत आहे.
रश्मिकाने हे फोटो शेअर करत, 'बरं... मला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! माझ्या पवित्र जिम मंदिरात मी जखमी झाले. आता मी पुढचे काही आठवडे किंवा महिने 'हॉप मोड'मध्ये आहे. देवालाच ठाऊक मी थामा, सिकंदर आणि कुबेराच्या सेटवर कधी परतणार. माझ्या दिग्दर्शकांना शुटिंगसाठी उशीर होत असल्यामुळे मी माफी मागते. माझा पाय ठीक झाला की मी लगेच परत येईन. तुम्हाला माझी गरज असल्याच मला कळवा मी माझ्या परिने पुन्हा सेटवर येण्याची तयारी करेन' या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
रश्मिकाच्या जवळच्या सूत्रांनी हिंदुस्थान टाईम्सला सांगितलं की, "रश्मिकाला नुकतीच जिममध्ये दुखापत झाली आहे. ती सध्या विश्रांती घेत आहे. मात्र, यामुळे तिच्या आगामी प्रोजेक्ट्सचे चित्रीकरण तात्पुरते थांबले आहे. तिला आता बरं वाटत आहे आणि लवकरच ती सेटवर काम सुरू करेल."
वाचा: दिवसा मला आई म्हणायचे अन् रात्री झोपायला बोलवायचे; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा
रश्मिका सध्या तिच्या पुष्पा 2: द रूल या चित्रपटाच्या यशाचा आनंद लुटत आहे, ज्यात अल्लू अर्जुन देखील मुख्य भूमिकेत आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटात अर्जुन, रश्मिका आणि फहाद फासिल यांनी पुष्पा राज, श्रीवल्ली आणि भंवर सिंग शेखावत यांच्या भूमिका साकारल्या आहेत. एआर मुरुगदास दिग्दर्शित आणि साजिद नाडियाडवाला निर्मित सिकंदर या चित्रपटात रश्मिका सलमान खानसोबत दिसणार आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत काजल अग्रवाल, रश्मिका, सत्यराज, शरमन जोशी आणि प्रतीक बब्बर यांच्या दुहेरी भूमिका आहेत. हा चित्रपट २०२५ च्या ईदला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यानंतर रश्मिका राहुल रवींद्रन दिग्दर्शित 'द गर्लफ्रेंड' या चित्रपटात झळकणार आहे. रश्मिकाचा कथित बॉयफ्रेंड विजय देवरकोंडायाने नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला. तिच्याकडे थामा, छावा आणि कुबेर हे देखील सिनेमे आहेत.
संबंधित बातम्या