मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rashmika-Vijay Engagement: रश्मिकाच्या प्रेमात आकंठ बुडाला विजय देवरकोंडा! ‘या’ दिवशी करणार साखरपुडा?

Rashmika-Vijay Engagement: रश्मिकाच्या प्रेमात आकंठ बुडाला विजय देवरकोंडा! ‘या’ दिवशी करणार साखरपुडा?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 09, 2024 12:56 PM IST

Rashmika Mandanna and Vijay Deverakonda Engagement: आता विजय देवरकोंडा लवकरच रश्मिका मंदनासोबत एंगेजमेंट करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Rashmika Mandanna and Vijay Deverakonda Engagement
Rashmika Mandanna and Vijay Deverakonda Engagement (HT )

Rashmika Mandanna and Vijay Deverakonda Engagement: साऊथचा सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा नेहमीच चर्चेत असतो. चित्रपट असो वा वैयक्तिक आयुष्य विजयच नाव नेहमीच प्रकाश झोतात असतं. मात्र, आता अभिनेता त्याच्या रिलेशनशीप आणि साखरपुड्याच्या वृत्तामुळे चर्चेत आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रश्मिका मंदना आणि विजय देवरकोंडा यांच्यात काहीतरी सुरू असल्याची चर्चा आहेत. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, दोघांनीही अद्याप त्यांचे नाते अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. इतक्यातच आता त्यांच्या साखरपुड्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

एकीकडे यांचे रिलेशनशीप चर्चेत असताना, दुसरीकडे दोघेही हैदराबादमध्ये एकत्र दिवाळी साजरी करताना आणि एकत्र व्हेकेशन करताना दिसले आहेत. दरम्यान, आता विजय देवरकोंडा लवकरच रश्मिका मंदनासोबत एंगेजमेंट करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात साखरपुडा करणार आहेत. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदनासोबत 'गीता गोविंदम' आणि ‘डियर कॉम्रेड’ अशा दोन चित्रपटांमध्ये काम केले होते.

आता खऱ्या आयुष्यात देखील ही जोडी एकत्र आली तर, त्यांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. दोघेही सध्या आपापल्या कामात व्यस्त आहेत. अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा नुकताच आलेला 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. या चित्रपटात रश्मिकासोबत रणबीर कपूर आणि बॉबी देओलही मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर अंदाजे ८०० कोटींची कमाई केली आहे. रश्मिकाच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे, तर ती सध्या अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा: द रुल'मध्ये काम करत आहे. या चित्रपटाचे शूटिंग सध्या सुरू आहे. अभिनेता विजय देवरकोंडा लवकरच परशुराम पेटलाच्या 'फॅमिली स्टार'मध्ये दिसणार आहे. तर, दिग्दर्शक गौतम तिन्ननुरी यांच्या 'व्हिडी १२'मध्ये देखील तो दिसणार आहे.

WhatsApp channel