Rashmika Mandanna Accident: ‘नॅशनल क्रश’ अभिनेत्री रश्मिका मंदना हिचा अपघात झाला आहे. तिने स्वत: सोशल मीडियावर एका दीर्घ पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये रश्मिकाने सांगितले की, तिच्या अपघातामुळे ती काही काळापासून सार्वजनिक कार्यक्रमातून गायब झाली आहे. सध्या डॉक्टरांनी रश्मिकाला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. रश्मिकाच्या या पोस्टमुळे चाहते काळजीत पडले असून, अभिनेत्री लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करत आहेत.
रश्मिकाने सोशल मीडियावर एक नो मेकअप फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये तिने असे लिहिले आहे की, 'होय, मला माहित आहे की, मी येथे सक्रिय नव्हते. आणि सार्वजनिकपणे कोणत्याही कार्यक्रमात हजर देखील झाले नाही. त्याचं कारण म्हणजे गेल्या महिन्यात माझा अपघात झाला होता. हा अपघात किरकोळ होता. पण डॉक्टरांनी मला सध्या आराम करण्यास सांगितले आहे. आता मी पूर्वीपेक्षा खूप बरी आहे आणि आता असे वाटत आहे की, मी काही गोष्टी करण्यात अधिक सक्रिय झाले आहे. मी तुम्हाला एवढेच सांगेन की, तुम्ही देखील स्वतःची आणखी काळजी घ्या. आयुष्यात काहीही सांगता येत नाही, सगळं खूप अप्रत्याशित आहे. आज जे आहे, ते उद्या असेल की नाही हे आम्हाला माहित नाही, म्हणून आत्ताच आनंदी रहा.’
अभिनेत्रीच्या पोस्टवर चाहते सातत्याने कमेंट करत आहेत आणि तिला लवकर बरे वाटावे म्हणून प्रार्थना करत आहेत. यापूर्वी रश्मिकाने तिच्या पाळीव कुत्र्यासोबतचा एक क्यूट व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती तिच्या लाडक्या कुत्र्यासोबत मस्ती करताना दिसली होती. हा व्हिडीओ शेअर करताना रश्मिकाने लिहिले होते की, 'तुम्ही सगळे मला विचारत होते की, आभा कशी आहे. मी सध्या तिच्यापासून दूर आहे, पण माझ्या फोन गॅलरीत हा गोंडस व्हिडीओ सापडला आहे.’
रश्मिका मंदना सध्या कामात प्रचंड व्यस्त आहे. तिच्या आगामी चित्रपटांच्या यादीमध्ये 'पुष्पा २ द रुल', 'छावा', 'सिकंदर' यांचा समावेश आहे. याशिवाय मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिका आता आयुष्मान खुरानासोबत 'व्हॅम्पायर्स ऑफ विजय नगर'मध्येही दिसणार आहे. याशिवाय 'ॲनिमल पार्क'मध्येही ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय तिच्या आणखी तीन चित्रपटांची नावे चर्चेत आहेत, ज्यात 'द गर्लफ्रेंड', 'रेनबो' आणि 'कुबेर' यांचा समावेश आहे.