Rapper Raftaar Wedding Video : बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर रफ्तार दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. त्याच्या लग्न समारंभाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. रफ्तारने त्याची फॅशन स्टायलिस्ट मनराजसोबत लग्न केले आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये रफ्तार आपल्या वधूसोबत ‘सपने में मिलती है’ या गाण्यावर डान्स करत आहे. त्याचवेळी त्याच्या हळदीची क्लिपही व्हायरल झाली आहे. रफ्तारचे अनेक चाहते त्याचे अभिनंदन करत आहेत.
मनोरंजन विश्वाचा लाडका रॅपर रफ्तार पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकला आहे. त्यांच्या लग्नातील फंक्शनची झलक सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. रफ्तारने आपल्या लग्नाचे व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेले नाहीत. पण, काही फॅन पेजने हे क्षण दाखवले आहेत. यातील एका क्लिपमध्ये रफ्तारची मेहंदी दिसत आहे. व्हायरल फोटोंमध्ये दिसत आहे की, रफ्तार आणि मनराज यांनी साऊथ इंडियन पद्धतीने लग्न केले आहे.
रफ्तारची नववधू मनराज जावंदा हिचा जन्म कोलकाता येथे झाला आणि ती फॅशन स्टायलिस्ट, फिटनेस फ्रीक आणि अभिनेत्री आहे. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मनराजने मुंबईतील एफएडी इंटरनॅशनलमध्ये स्टायलिंगचा कोर्स केला आहे. अभिनेत्रीने रॅपर रफ्तारसोबत अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये काम केले आहे, ज्यात 'काली कार', 'घाना कसुटा' आणि 'शृंगार' यांचा समावेश आहे. ती अनेक रिॲलिटी शोचा भागही राहिली आहे. याशिवाय मनराजने अनेक टीव्ही शो तसेच जाहिरातींमध्ये काम केले आहे.
रफ्तारचे पहिले लग्न २०१६ मध्ये झाले होते. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव कोमल आहे. पाच वर्षे डेट केल्यानंतर तिने त्याच्याशी लग्न केले होते. मात्र, हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. जून २०२२ मध्ये रफ्तार आणि कोमल यांच्या घटस्फोटाच्या बातम्या आल्या होत्या. त्यांनी २०२०मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला, ज्याला कोव्हिडमुळे मान्यता मिळण्यास वेळ लागला होता.
रफ्तारने बॉलिवूडला अनेक हिट गाणी दिली आहेत, ज्यात ‘धाकड’, ‘ढिशूम’, ‘ऑल ब्लॅक’, ‘बेबी मारवाके मानेगी’, ‘हसीनो का दीवाना’, ‘जानू’, ‘डान्स का शौक’, ‘जिंदा है’, ‘घना कसुटा’ यांचा समावेश आहे. त्याने ‘एमटीव्ही हसल’, ‘डान्स इंडिया डान्स’ आणि ‘रोडीज’ यांसारख्या रिॲलिटी शोचे परीक्षणही केले आहेत. आजकाल रॅपर एमटीव्ही ‘हसल सीझन ४’ जज करत आहे. रिपोर्ट्सनुसार, रॅपरची एकूण संपत्ती ८० कोटी रुपये आहे.
संबंधित बातम्या