आपल्या वैशिष्टपूर्ण अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारा आणि जागतिक पातळीवरील चित्रपट निर्मात्यांचे लक्ष वेधून घेणारा अभिनेता म्हणजे रणवीर शौरी. तो नेहमीच अभिनयाशिवाय त्याच्या परखड वक्तव्यांसाठी ओळखला जातो. अनेकदा त्याला ट्रोल देखील केले जाते. सध्या सोशल मीडियावर रणवीरची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्याने प्रभू श्रीराम यांची माफी मागितली आहे.
देशभरात सध्या राम मंदिराच्या उद्घाटनाचा आनंद साजरा केला जात आहे. त्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २२ जानेवारी रोजी तर खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आयोध्येमध्ये धामधुमीचे वातावरण दिसत आहे. राममंदिराच्या उद्घाटनाची जय्यत तयारी सुरु असल्याचे पाहायला मिळते. दरम्यान, अभिनेता रणवीर शौरीने पोस्ट शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
वाचा: जॉन अब्राहमने मुंबईतील पॉश भागात खरेदी केला नवा बंगला, किंमत ऐकून बसेल धक्का
रणवीरने पोस्टमध्ये प्रभू श्रीराम यांची माफी मागितली आहे. 'मी पहिल्यांदा देखील हिंदूमध्ये सहभागी होतो. जी लोकं ही राम मंदिर आणि बाबरी मस्जिद केसच्या दरम्यान त्या विवादित जागेवर मोठं रुग्णालय बांधण्याचा विचार करत होते. त्यांच्या त्या पक्षामध्ये मी देखील सहभागी होतो. त्यामुळे मी आता त्या सर्वांची माफी मागतो. माझ्या त्या जुन्या मागणीमुळे मला माफी मागावी लागत आहे. हे प्रभु श्रीराम मला माफ कर आणि मला सदबुद्धी दे' असे रणवीरने पोस्टमध्ये म्हटले आहे.
२२ जानेवारी रोजी अयोध्येतील मंदिरात प्रभु श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यासाठी पूर्ण शहराची सजावट करण्यात आली आहे. देशभरातील विविध मान्यवरांना त्यासाठी निमंत्रणही देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच या खास सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील विमानतळाचे आणि नव्या रेल्वेचे उद्धघाटन केले होते.