बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा नुकताच 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात दीपिकासोबत अभिनेता प्रभास, अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेते कमल हासन मुख्य भूमिकेत आहेत. आता दीपिकाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तिचा पती रणवीर सिंग चित्रपटाचा रिव्ह्यू देताना दिसत आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी दीपिका रणवीर आणि त्याच्या आई-वडिलांसोबत हाच चित्रपट थिएटरमध्ये पाहण्यासाठी गेली होती. त्यांचा थिएटरमध्ये जातानाचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे.
दीपिकाने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर दीपिकाला कल्की चित्रपटाचा रिव्ह्यू सांगत आहे. तसेच रणवीरला हा चित्रपट आवडला असल्याचे चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. दीपिका प्रेग्नंट असतानाही तिने शूट केले आणि तिचा प्रत्येक सीन हा अतिशय खरा वाटणारा आहे. हा चित्रपट पाहणे माझ्यासाठी ट्रॉफी आहे. विशेषत: अशी व्यक्तिरेखा जिथे ती (दीपिका) गरोदर आहे आणि खऱ्या आयुष्यातही ती गरोदर आहे असे रणवीर व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.
वाचा: पावसावरील 'ती' पोस्ट अभिनेत्री सई ताम्हणकरने केली डिलिट, काय आहे नेमकं कारण?
तर दुसरीकडे दीपिका व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे की, मला काय वाटतय हे मी तु्म्हाला शब्दात नाही सांगू शकत. पण इतरांच्या प्रतिक्रिया पाहून मला खूप आनंद झाला आहे. व्हिडीओच्या शेवटी दीपिका चाहत्यांशी संवाद साधताना देखील दिसत आहे.
वाचा: या आरोपींना फाशीची शिक्षा द्या; ‘वरळी हिट अँड रन’ प्रकरणात ज्येष्ठ अभिनेत्याच्या पुतणीचा मृत्यू
काही दिवसांपूर्वी कल्की चित्रपटातील अभिनेता शाश्वत चॅटर्जीने सेटवरील एक अनुभव शेअर केला होता. 'चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये त्याला दीपिकाचे केस पकडून तिला ओढते न्यायचे आहे. त्यावेळी दीपिका गरोदर होती. रणवीर सिंग देखील सेटवर उपस्थित होता. तो एका जागी उभा राहिला नाही. तो सीन थोडा कठीण असल्यामुळे मी रणवीरकडे गेलो आणि त्याला म्हणाले काळजी करु नका. चॅलेंजिंग सीनसाठी बॉडी डबल देखील असतात. ते ऐकून तो हसला आणि मला म्हणाला हो मला माहिते आहे' असे शाश्वत म्हणाला.
वाचा: सलमान खानपासून रणवीर सिंगपर्यंत सेलिब्रिटींनीही अनंत-राधिकाच्या हळदीत केली धमाल
'कल्की 2898' चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर रिपोर्टनुसार, या चित्रपटाने १२ दिवसांत जागतिक स्तरावर ९०० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
संबंधित बातम्या