बॉलिवूडमधील सर्वात एनर्जेटीक अभिनेता म्हणून रणवीर सिंग ओळखला जातो. त्याने आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का अभिनेता रणबीर कपूरने नाकारलेला चित्रपट रणवीरला मिळाला आणि त्याचे संपूर्ण आयुष्य बदलले. आज ६ जुलै रोजी रणवीरचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी...
रणबीर कपूरने अनेक सुपरहिट चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्या होत्या. या यादीमध्ये 'गली बॉय', 'बेफिक्रे', 'दिल धड़कने दो', 'गोलियों की रासलीला रामलीला' आणि 'बँड बाजा बारात' या चित्रपटांचा समावेश आहे. रणवीर सिंहने साईन केलेले हे सर्व चित्रपट हिट ठरले होते.
वाचा: मनी लाँड्रींग प्रकरणात निया शर्मा, करण वाही आणि क्रिस्टल डिसूझाची चौकशी
बँड बाजा बारात या चित्रपटात काम करत रणवीरने चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. पण तुम्हाला माहितीये का या चित्रपटासाठी निर्मात्यांनी सुरुवातीला रणवीर नाही तर रणबीर कपूरची निवड केली होती. रणबीरला काही कारणास्तव शक्य न झाल्यामुळे या चित्रपटात रणवीरला कास्ट करण्यात आले. असे अनेक चित्रपट आहेत ज्यांची ऑफर रणबीरने नकारली आणि ते चित्रपट रणवीरला मिळाले. पुढे जाऊन हेच चित्रपट सुपरहिट ठरले.
वाचा: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राची ५० लाख रुपयांची फसवणूक? काय झालं नेमकं वाचा
रणवीर सिंहचे असे अनेक चित्रपट आहेत जे सुपरहिट ठरले होते. ज्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. त्यामध्ये 'रॉकी और रानी की प्रेम कहानी', 'सर्कस', 'बैजू बावरा', 'तख्त', 'सिंबा 2' आणि 'अन्नियन' रीमेक या चित्रपटांचा समावेश आहे.
वाचा: नीना गुप्ता-व्हीव रिचर्ड्स यांची पहिली भेट कुठे झाली? वाचा लव्हस्टोरी
आज रणवीर त्याचा वाढदिवस कुठे आणि कसा सेलिब्रेट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच रणवीर पार्टीला कोणा कोणाला बोलावणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत
रणवीर सिंग आता लवकर बाबा होणार आहे. दीपिका एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे. तिने काही बेबीबंपसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.