बाळ जन्माला येण्याआधीच होणार रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांचा घटस्फोट? का आलं चर्चांना उधाण?-ranveer singh and deepika padukone will divorce before the baby is born know the truth ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  बाळ जन्माला येण्याआधीच होणार रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांचा घटस्फोट? का आलं चर्चांना उधाण?

बाळ जन्माला येण्याआधीच होणार रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांचा घटस्फोट? का आलं चर्चांना उधाण?

May 08, 2024 07:41 AM IST

असं नेमकं काय घडलं, ज्यामुळे रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्या वेगळं होण्याच्या चर्चा सुरू झाल्या? चला जाणून घेऊया...

बाळ जन्माला येण्याआधीच होणार रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांचा घटस्फोट? का आलं चर्चांना उधाण?
बाळ जन्माला येण्याआधीच होणार रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांचा घटस्फोट? का आलं चर्चांना उधाण?

बॉलिवूडचे पॉवर कपल अर्थात अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण अचानक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. आता या दोघांच्या वैवाहिक जीवनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जेव्हापासून हे दोघे करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये सहभागी झाले होते, तेव्हापासून त्यांच्यातील मतभेदाच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र, आता ही जोडी वेगळी होणार असल्याच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे. असं नेमकं काय घडलं, ज्यामुळे दोघांच्या वेगळं होण्याच्या चर्चा सुरू झाल्या? चला जाणून घेऊया...

रणवीरने डिलीट केले लग्नाचे फोटो?

असे म्हटले जात आहे की रणवीर आणि दीपिका यांच्यातील मतभेद इतके वाढले आहेत की, अभिनेत्याने आता त्याच्या इंस्टाग्रामवरून लग्नाचे फोटो हटवले आहेत. रणवीर सिंहच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या आणि दीपिकाच्या लग्नाचे फोटो दिसत नाहीयत. मात्र, दीपिकाने अद्याप तिच्या अकाऊंटवरून लग्नाचे फोटो हटवलेले नाहीत. या दोघांमध्ये नेमके काय चालले आहे, याबाबत चाहतेही आता संभ्रमात पडले आहेत. त्याचबरोबर लग्नाचे फोटो वगळता दीपिकासोबतचे इतर फोटो रणवीर सिंहच्या अकाउंटवर उपलब्ध आहेत.

अभिराम खरंच लीलाच्या कानाखाली मारणार? ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत येणार जबरदस्त ट्विस्ट

व्हायरल फोटोतून सत्य बाहेर आले!

पण, जर अभिनेत्याने लग्नाचे फोटो डिलीट केले असतील, तर बाकीचे फोटो का डिलीट केले नाहीत? हा प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण होत आहे. दोघांचे बाळ या जगात येण्यापूर्वीच ही जोडी खरोखर वेगळी होईल का, असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. तर या प्रश्नाचे उत्तर एका व्हायरल फोटोने दिले आहे. आता या जोडप्याचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यामध्ये दोघेही बेबीमून एन्जॉय करताना दिसले आहेत. दोघेही एका जहाजात आपला एकत्र वेळ घालवत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही फोटोंमध्ये दीपिका आरामदायी कपड्यांमध्ये दिसली आहे. त्याचवेळी काही फोटोंमध्ये तिचा बेबी बंपही दिसत आहे.

लग्नाचे फोटो न दाखवण्याचे कारण काय?

या व्हायरल फोटोमध्ये तिचा पती रणवीर सिंहही तिच्या मागे दिसत आहे. आता या दोघांना एकत्र पाहिल्यावर हे दोघे अजूनही क्वालिटी टाइम स्पेंड करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत घटस्फोटाची बातमी ही केवळ अफवा असून त्यात तथ्य नसल्याचे देखील म्हटले जात आहे. यावर स्पष्टीकरण देताना रणवीर सिंहच्या टीमने म्हटले की, अभिनेत्याने त्याच्या लग्नाच्या फोटोंसह २०२३ पूर्वीच्या सर्व पोस्ट हटवलेल्या नाहीत, तर त्या आर्काईव्ह केल्या आहेत. सोशल मीडिया मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी लक्षात घेऊन या जोडप्याने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.