Rakhi Sawant Reaction On Ranveer Allahbadia : बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत युट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या समर्थनार्थ पुढे आली आहे. एका व्यक्तीच्या आई-वडिलांबद्दल ‘इंडियाज गॉट लॅटेंट’वर केलेल्या कमेंटनंतर रणवीरला सोशल मीडियावर सातत्याने ट्रोल केले जात असून, यादरम्यान अनेक बड्या सेलिब्रिटींनी त्याच्यासोबतचे पॉडकास्ट देखील रद्द केले आहेत. 'बिअर बायसेप्स' या नावाने प्रसिद्ध असलेल्या रणवीर अलाहाबादियाने वाद वाढत असल्याचे पाहून आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली असली तरी इंटरनेटवर त्याचे ट्रोलिंग सुरूच आहे. दरम्यान, राखी सावंतने रणवीरला पाठिंबा देत 'त्याला माफ करा, कधी कधी गोष्टी घडतात', असे म्हटले आहे.
युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने समय रैनाच्या शो ‘इंडियाज गॉट लॅटेंट’मध्ये सामील झालेल्या एका व्यक्तीला प्रश्न विचारला की, ‘तुम्ही तुमच्या आई-वडिलांना आयुष्यभर सेक्स करताना पाहाल की एक दिवस तुम्ही त्यांच्यासोबत सामील व्हाल जेणेकरून हे सर्व कायमचे थांबेल?’ रणवीरचे हे विधान इंटरनेटवर आगीसारखे पसरले आणि सगळीकडेच त्याच्या विरुद्ध तक्रारी दाखल होऊ लागल्या. आता राखी सावंतने युट्यूबरला पाठिंबा देत म्हटले की, ‘त्याला माफ करा यार. काही हरकत नाही, असे कधी कधी घडते. अनेकदा अशा गोष्टींमध्ये माफ करावं लागतं. त्याने चूक केली हे मला माहीत आहे, पण आता त्याला माफ करा.’
‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत रणवीरच्या समर्थनार्थ पुढे येताच आता चाहते तिला देखील ट्रोल करू लागले आहेत. एकीकडे लोक रणवीर अलाहबादियाला राखी सावंतचा भाऊ म्हणत आहेत. तर, दुसरीकडे राखीला देखील अशा लोकांचा हिला फार कळवळा असल्याचे बोलत आहेत. तर, राखी सावंत हिने मात्र अशा चुका कधी कधी नकळत घडतात, असे म्हणत त्याला माफ करण्याचे आवाहन केले आहे.
युट्युबवर रणवीर अलाहाबादिया खूप लोकप्रिय आहे आणि तरुणांमध्येही तो खूप लोकप्रिय आहे. पण त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर असे युट्यूबर्स समाजाला काय देत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रणवीर अलाहाबादियाने स्वत: इंटरनेटवर माफी मागितली असून, आपण कोणतेही स्पष्टीकरण देणार नसल्याचे म्हटले आहे. त्याने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलं की, 'मला फक्त प्रेक्षकांची माफी मागायची आहे. माझं वक्तव्य केवळ अयोग्यच नव्हतं, तर गंमतीशीरही नव्हतं. मला कॉमेडीची कुवत नाही. मी इथे फक्त माफी मागायला आलो आहे.
संबंधित बातम्या