मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rang Maza Vegla: सौंदर्याच्या नजरेस पडली आयेशा; दीपाला होणाऱ्या त्रासाचं कारण आता समोर येणार?

Rang Maza Vegla: सौंदर्याच्या नजरेस पडली आयेशा; दीपाला होणाऱ्या त्रासाचं कारण आता समोर येणार?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 24, 2023 05:08 PM IST

Rang Maza Vegla Latest Update: आपल्या मुलीसारख्या सुनेला त्रास देणाऱ्या व्यक्तीला शोधण्यासाठी आता सौंदर्या इनामदार आकाश पाताळ एक करणार आहे.

Rang Maza Vegla
Rang Maza Vegla

Rang Maza Vegla Latest Update:रंग माझा वेगळा’ या मालिकेत आता बदल्याचा नवा खेळ पाहायला मिळणार आहे. दीपाला होणारा त्रास आता सौंदर्याच्या लक्षात आला आहे. त्यामुळे आता सौंदर्या या संपूर्ण प्रकरणाच्या तळाशी जाणार आहे. आपल्या मुलीसारख्या सुनेला त्रास देणाऱ्या व्यक्तीला शोधण्यासाठी आता सौंदर्या इनामदार आकाश पाताळ एक करणार आहे. मात्र, या दरम्यान आयेशा तिच्या नजरेस पडल्याने आता तिच्या संशयाची सुई तिच्या दिशेने वळली आहे. मात्र, यामुळे आता कार्तिक सोकावणार आहे.

कार्तिक आणि श्वेताने मिळून दीपाला किडनॅप करण्याचा प्लॅन रचला होता. यावेळी त्यांनी दीपाला किडनॅप करून, तिच्यासमोर जोकर आणि टेडी बियरचे कपडे घातलेले लोक उभे केले. याच लोकांनी दीपाला पुन्हा घरी देखील आणून सोडले होते. आपल्या सोबत नक्की काय झालं हे सांगताना दीपा मात्र पुरती गांगरून गेली होती. खरं काय आणि खोटं काय यावर देखील तिचा विश्वास बसत नव्हता. याच ग्लानीत तिने स्वतःसोबत घडलेला सगळा प्रकार सासू सौंदर्याला सांगितला. आता मात्र, दीपासोबत काहीतरी चुकीचं घडत असल्याचं सौंदर्याच्या देखील लक्षात आलं आहे.

Shiv Thakare : शिव ठाकरेच्या हातून निसटले दोन मोठे चित्रपट! कारण ऐकून व्हाल हैराण

आता सौंदर्याला संशय आल्याने ती या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतःसोबत नक्की काय घडतंय याची कल्पना नसणारी दीपा पुरती हादरून गेली आहे. आपली अवस्था सांगताना ती आपल्याला वेड लागल्याचं सौंदर्याला सांगते. यावेळी मात्र सगळा घडला प्रकार सौंदर्याच्या लक्षात आला आहे. दीपाला वेड लागलेलं नसून, कुणीतरी या सगळ्या गोष्टी तिच्यासोबत मुद्दाम करत आहे. जाणूनबुजून दीपाला कुणीतरी असा त्रास देतंय, हे सौंदर्याच्या लक्षात आल्याने आता तिच्या संशयाची सुई आयेशाच्या दिशेने वळली आहे.

मालिकेच्या कथानकात आयेशाची नुकतीच एन्ट्री झाली आहे. आता ती पुन्हा एकदा कार्तिक आणि दीपाच्या आयुष्यात आली आहे. मात्र, यावेळी कथेतला ट्वीस्ट म्हणजे आयेशाला वेड लागलं आहे. १४ वर्षांपूर्वी कार्तिकपासून दुरावलेली आयेशा आता पुरती वेडी झाली असून, तिला कार्तिकच आपला पती असल्याचा भास होत आहे. ती स्वतःच्या आभासी जगात कार्तिकसोबत संसार थाटून त्यात रमली आहे. मात्र, आता तिचा सामना थेट सौंदर्या इनामदारशी होणार आहे.

IPL_Entry_Point