Rang Maza Vegla: ‘रंग माझा वेगळा’मधून ‘या’ दोन मुख्य कलाकारांची एक्झिट? चर्चांना उधाण!
Rang Maza Vegla Latest Update: ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत ‘आदित्य इनामदार’ आणि ‘ललित इनामदार’ हे पात्र साकारणारे दोन्ही कलाकार गेल्या काही दिवसांपासून मालिकेत दिसत नाहीयेत.
Rang Maza Vegla Latest Update: मराठी मनोरंजन विश्वात सध्या ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकेत सध्या वेगवेगळे ट्वीस्ट आणि टर्न्स पाहायला मिळत आहेत. सध्या ही मालिका प्रेक्षकांना जागीच खिळवून ठेवण्यात यशस्वी यशस्वी ठरत आहे. मालिका यशाच्या शिखरावर असतानाच आता या मालिकेतील दोन मुख्य कलाकारांनी यातून एक्झिट घेतल्याचे बोलले जात आहे. यातील एका पात्राच्या जागी नवा कलाकार देखील आला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत ‘आदित्य इनामदार’ आणि ‘ललित इनामदार’ हे पात्र साकारणारे दोन्ही कलाकार गेल्या काही दिवसांपासून मालिकेत दिसत नाहीयेत. तर, काहीच दिवसांपूवी ‘आदित्य’चे पात्र साकारण्यासाठी एका नव्या अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. या आधी हे पात्र अभिनेता अंबर गणपुले साकारत होता. मात्र, आता तो ‘लोकमान्य’ या मालिकेत दिसत आहे. यामुळे त्याची जागा आता नव्या अभिनेत्याने घेतली आहे. तर, ललित इनामदार हे पात्र सध्या परगावी गेल्याचे दाखवण्यात आले आहे.
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते श्रीरंग देशमुख हे ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत ‘ललित इनामदार’ हे पात्र सकारात होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते या मालिकेत दिसलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी देखील आता ही मालिका सोडल्याचे बोलले जात आहे. मात्र, यावर अद्याप वाहिनीकडून अथवा कलाकारांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
कार्तिक न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगून आता १४ वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर येणार असून, त्याच्या स्वभावात मोठा बदल होणार आहे. दीपानेच बदल घेण्यासाठी मुद्दाम हा डाव रचला आणि आपल्याला तुरुंगात धाडलं असा कार्तिकचा समज झाला आहे. याचा सूड आता कार्तिक उगवणार आहे. आता कार्तिकचं बदललेलं रूप पाहायला मिळणार आहे. कार्तिकचं हे नवं रूप पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसणार आहे. मालिका सध्या मनोरंजक वळणावर पोहोचली आहे.