मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rang Maza Vegla: कार्तिकचा खुनशी डाव सफल होणार; सौंदर्या दीपाच्या विरोधात जाणार!

Rang Maza Vegla: कार्तिकचा खुनशी डाव सफल होणार; सौंदर्या दीपाच्या विरोधात जाणार!

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 23, 2023 03:17 PM IST

Rang Maza Vegla Latest Update: दीपाने आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा कांगावा करत, कार्तिक आई सौंदर्या इनामदार हिचा विश्वास संपादन करणार आहे.

Rang Maza Vegla
Rang Maza Vegla

Rang Maza Vegla Latest Update:रंग माझा वेगळा’ या मालिकेत आता दीपा विरोधात कार्तिकने रचलेला डाव सफल होताना दिसत आहे. घरातील सगळं वातावरण दीपाच्या विरोधात कसं जाईल यासाठी कार्तिक सतत प्रयत्न करत होता. त्यांचा हा प्रयत्न आता यशस्वी होणार आहे. दीपाने आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा कांगावा करत, कार्तिक आई सौंदर्या इनामदार हिचा विश्वास संपादन करणार आहे. तर, दीपाच आपल्या मुलाला फसवत आहे, यावर सौंदर्याचा विश्वास देखील बसणार आहे.

१४ वर्ष शिक्षा भोगून आलेला कार्तिक बाहेर येऊन केवळ दिखाव्याचं प्रेम करतोय, हे दीपाच्या समोर आलं आहे. कार्तिकचं खरं रूप समोर आल्यानंतर आता दीपाला मोठा धक्का बसला आहे. तुरुंगातून सुटल्यापासून कार्तिक काहीतरी विचित्र वागतोय याचा अंदाज दीपाला आलाच होता. मात्र, तिने हा केवळ भ्रम असावा, अशी मनाची समजूत घातली होती. मात्र, आता तिचा हा भ्रमाचा भोपळा फुटला आहे. कार्तिक तुरुंगातून आल्यापासून त्याच्या स्वभावात झालेला बदल दीपाने बरोबर ओळखला होता.

Ghar Banduk Biryani: आता ओटीटीवरही पाहता येणार ‘घर बंदूक बिरयानी’; पाहा कधी आणि कुठे होणार रिलीज

कार्तिकचा बदललेला स्वभाव वेळोवेळी तिने सौंदर्याच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्नही केला. मात्र, सौंदर्या इनामदार हिने नेहमीच मुलाची म्हणजे कार्तिकची बाजू घेतली. कार्तिक १४ वर्ष तुरुंगात होता. त्यामुळे कदाचित त्याला या वातावरणाची सवय राहिली नसेल. त्याला थोडा वेळ देऊया, असं सौंदर्या इनामदारचे मत होते. मात्र, दीपा नेहमीच कार्तिकपासून सावध राहण्याचा प्रयत्न करत होती. तरीही आता कार्तिकने तिला यात फसवले आहे. दीपाचा जीव घेण्यासाठी केलेला प्लॅन त्याने स्वतःवर वापरला आणि आपण यात कसे अडकलो याची कथा रचून सौंदर्याला सांगितली.

फार्महाऊसवर बंदूक कुठून आली, असा प्रश्न सौंदर्याने उपस्थित केला आहे. यावे कार्तिक तिला खोटं सांगतो की, दीपाने ती बंदूक आपल्याला मारण्यासाठी आणली होती. तिनेच आपल्यावर गोळी चालवली, अशी भाकड कथा तो सौंदर्याला सांगतो. यावर तिचा विश्वास देखील बसला आहे. आता ती दीपाविरोधात जाणार असून, दीपालाच खोटं ठरवणार आहे.

IPL_Entry_Point