मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rang Maza Vegla: दीपावर कोसळणार नवं संकट! ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत नवा ट्वीस्ट

Rang Maza Vegla: दीपावर कोसळणार नवं संकट! ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत नवा ट्वीस्ट

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 26, 2023 07:12 PM IST

Rang Maza Vegla Latest Update : आधीच इनामदारांच्या घरात दीपाला कार्तिक आणि श्वेता यांच्यापासून मोठा निर्माण झाला होता. त्यातच आता आयेशा देखील परतून आल्याने तिच्या संकटात आणखी वाढ झाली आहे.

Rang Maza Vegla
Rang Maza Vegla

Rang Maza Vegla Latest Update :रंग माझा वेगळा’ या मालिकेत आता दीपावर आणखी एक संकट कोसळणार आहे. आधीच इनामदारांच्या घरात दीपाला कार्तिक आणि श्वेता यांच्यापासून मोठा निर्माण झाला होता. त्यातच आता आयेशा देखील परतून आल्याने तिच्या संकटात आणखी वाढ झाली आहे. आता दीपाला वेडं ठरवून कार्तिक तिच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना बोलावणार आहे. मात्र, आता कार्तिक डॉक्टरांना हाताशी धरून दीपाला त्रास देणार आहे. आता दीपाला त्रास देण्यासाठी कार्तिक आणि श्वेता नवा डाव रचणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून दीपासोबत सतत वेगवेगळे प्रकार घडत आहेत. कधी तिने केलेल्या पुरणपोळ्या गायब होतात. तर कधी तिच्या हातातील पेपर जळायला लागतात. तर, कधी तिच्या समोरची अक्षर देखील उलटी दिसू लागतात. नुकताच तिला किडनॅप करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता. तर, तिला किडनॅप करणाऱ्या लोकांनी टेडी बियर आणि जोकरचे कपडे घातले होते. त्यामुळे आता दीपा पुरती गोंधळून गेली आहे. ती स्वतःसोबत घडणाऱ्या गोष्टी इतरांना सानाग्ताना देखील गोंधळात पडली आहे.

Dahaad Teaser Out: एक-दोन नव्हे २७ तरुणींच्या शोधात निघाली सोनाक्षी सिन्हा! ‘दहाड’चा जबरदस्त टीझर पाहिलात?

या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आता तिला वेड लागलं आहे, हे पटवून देण्याचं काम कार्तिक करत आहे. मात्र, दीपासोबत घडत असलेल्या या सगळ्या गोष्टी कुणीतरी मुद्दाम करत असल्याचं सौंदर्या इनामदारच्या लक्षात आलं आहे. यामुळे सौंदर्या आता या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्या आधीच दीपाला त्रास देण्याचा नवा प्लॅन कार्तिकने तयार केला आहे. यात आयेशा देखील सहभागी होऊ शकते याचा विचार कार्तिकने केला देखील नव्हता. त्यांच्या आयुष्यात आता आयेशाची एन्ट्री झाली आहे.

१४ वर्षांपूर्वी कार्तिकपासून दुरावलेली आयेशा आता पुरती वेडी झाली असून, तिला कार्तिकच आपला पती असल्याचा भास होत आहे. ती स्वतःच्या आभासी जगात कार्तिकसोबत संसार थाटून त्यात रमली आहे. मात्र, आता तिचा सामना थेट दीपा इनामदारशी होणार आहे.

WhatsApp channel