मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rang Maza Vegla: अखेर दीपाला सत्य समजणार! आयेशा विरोधातील पुरावे मिळवू शकणार?

Rang Maza Vegla: अखेर दीपाला सत्य समजणार! आयेशा विरोधातील पुरावे मिळवू शकणार?

May 25, 2023 04:42 PM IST

Rang Maza Vegla latest Episode: आपण आता जगू शकणार नाही, हे लक्षात आल्यावर आता घाडगे वकील दीपाला सत्य सांगणार आहे.

Rang Maza Vegla
Rang Maza Vegla

Rang Maza Vegla latest Episode: छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ आता एका वेगळ्या वळणावर आल्याचे पाहायला मिळणार आहे. या मालिकेत आता कार्तिकच्या बदल्याचा खेळ मागे पडणार असून, पुन्हा एकदा घाडगे वकिल सत्य सांगून सगळ्यांच्या आयुष्यात एक नवं वादळ घेऊन येणार आहे. इनामदारांच्या घरात सध्या सुरू असलेली उलथापालथ ही केवळ घाडगे वकिलाच्या दुष्ट मनसुब्यांमुळेच झाली आहे. मात्र, तो आता तो दीपाला सगळं सत्य सांगणार आहे. याच दरम्यान तो आता साक्षीच्या हत्येचा गुन्हा देखील समोर आणणार आहे. मात्र, दीपाला सत्य सांगताच त्याचा मृत्यू होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कार्तिक आणि दीपा इनामदार यांच्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी घाडगे वकिलाने आता आयेशा आणि तिच्या कुटुंबाला हाताशी धरलं होतं. एकाच दगडात दोन पक्षी मारता यावेत असा डाव त्याने आखला होता. मात्र, आता त्याचा हाच डाव त्याच्यावर उलटला आहे. एकीकडे त्याने आयेशाला एका गुन्हातून बाहेर काढून तिच्या कुटुंबाला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली होती. दीपाची मैत्रीण साक्षी हिचा खून कार्तिकने नव्हे तर, आयेशाने केला आहे, हे सत्य आता तो दीपाला सांगून टाकणार आहे. घाडगे वकिलाने स्वतःच्या डावात आयेशाच्या बहिणीचा मुलगा आर्यन याला देखील सामील करून घेतलं होतं. मात्र, आता हा खेळ त्याच्या जीवावर बेतणार आहे.

Tu Chal Pudha: अखेर प्रतीकला ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीचा चेहरा येणार समोर! ‘तू चाल पुढं’मध्ये ट्वीस्ट

आपण आता जगू शकणार नाही, हे लक्षात आल्यावर आता घाडगे वकील दीपाला सत्य सांगणार आहे. जखमी अवस्थेत दीपाला शोधात तो मंदिरात पोहोचला आहे. या वेळी तो दीपाच्या पायाशी लोळण घेणार आहे. तर, साक्षीचा खून कार्तिकने नाही तर, आयेशाने केला आहे, हे सत्य सांगणार आहे. तर, आयेशाच्या या काळ्या कारनाम्याचे पुरावे पेन ड्राईव्हमध्ये असल्याचे देखील तो सांगणार आहे. मात्र, हा पेन ड्राईव्ह नेमका कुठे आहे, हे सांगण्या आधीच त्याचा मृत्यू होणार आहे.

आता साक्षीच्या खुनाचं सत्य दीपाला कळलं आहे. मात्र, याचा पुरावा आता ती कसा शोधून काढणार हे मालिकेच्या पुढील भागात पाहायला मिळणार आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४