Rang Maza Vegla latest episode 31 August 2023: ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मात्र, शेवटच्या दोन-तीन भागात देखील प्रेक्षकांना धमाकेदार कथानक पाहायला मिळणार आहे. आता दीपा आणि कार्तिक यांचा प्लॅन आता फसण्याची शक्यता वाढली आहे. श्वेताला दीपा आणि कार्तिकचा सगळा प्लॅन कळणार आहे. दीपा आणि कार्तिक खोटं नाटक करत आहेत, असा संशय सुरुवातीपासूनच श्वेताला होता. या सगळ्यात तिने सगळ्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली होती. अखेर दीपा कार्तिकी आणि दीपिकाला सगळा प्लॅन समजावून सांगत असताना श्वेताने ऐकला आहे.
श्वेताने हा प्लॅन ऐकल्यानंतर आता ती सगळं सत्य जाऊन आयेशाला सांगणार आहे. दुसरीकडे सौंदर्या इनामदार मात्र आयेशाला विश्वासात घेऊन सत्य वदवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, तिचा हा डाव आता श्वेता उधळून लावणार आहे. हे सगळं नाटक असून, तुझं आणि कार्तिकचं लग्न कधीच होणार नाही, असं श्वेता आयेशाला सांगणार आहे. दुसरीकडे, आपण मांडवात कार्तिकचा खोटा खून करणार असल्याचा डाव दीपाने तिच्या मुलींना सांगितला आहे.
आयेशा मागील काही वर्षांपासून स्वतःच्या एका काल्पनिक विश्वात जगत आहे. तिला मानसिक धक्का बसल्याने तिची स्मृती काही अंशी नष्ट झाली आहे. मात्र, तिला यातून बाहेर काढायचे असेल, तर एखादा मोठा झटका देणे गरजेचे आहे, असे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे आता दीपा कार्तिकच्या जीव घेण्याचं नाटक रचणार आहे. यामुळे तरी आयेशाला धक्का बसेल आणि ती पुन्हा पूर्ववत होतील, असे दीपाला वाटत आहे.
सगळे प्रयत्न करून देखील आयेशा खरं सांगत नाहीये हे कळल्यावर आता दीपा कार्तिकच्या मृत्यूचा डाव रचणार आहे. यादरम्यान आता ती इनामदारांच्य घरात मोठा तमाशा करणार आहे. दीपा आयेशाला घराबाहेर निघून जायला सांगणार आहे. मात्र, यावेळी कार्तिक आयेशाच्या बचावासाठी पुढे येण्याचं नाटक करणार आहे. आयेशा या घरातून कुठेही जाणार नाही, असे कार्तिक म्हणणार आहे. तर, मी तुला घटस्फोट देऊन आयेशाशी लग्न करणार, असे देखील तो बोलणार आहे. तर, यावेळी दीपा त्याला जीवे मारण्याची धमकी देणार आहे.
संबंधित बातम्या