Rang Maza Vegla Latest Episode 29 August 2023: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ आता मनोरंजक वळणावर आली आहे. आता दीपा आणि कार्तिक आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत मिळून आयेशा आणि श्वेता यांना आपल्या डावात अडकवून त्यांच्याकडून सत्य परिस्थिती समोर आणणार आहेत. आता या मालिकेत अतिशय रंजक वळण येणार आहे. अखेर सत्याचा विजय होणार असून, वाईटाचा नाश होणार आहे. यासाठी आता संपूर्ण इनामदार कुटुंब एकत्र आलं आहे. आपल्या लढ्याला यश मिळावं म्हणून दीपा आणि कार्तिक शक्य ते सगळे प्रयत्न करणार आहेत.
आता इनामदारांच्या घरातील महिलावर्गाने आयेशा आणि श्वेता विरोधात चांगलंच बंड पुकारलं आहे. सगळ्या एकत्र येऊन आपल्या कुटुंबाला त्रास देणाऱ्या लोकांचा बदला घेणार आहेत. त्यांना चांगलीच अद्दल घडवणार आहेत. आता दीपा, सौंदर्या, कार्तिकी आणि दीपिका यांनी ठरवलेल्या प्लॅननुसार कार्तिकी श्वेताचा विश्वास जिंकून तिच्याकडून सत्य परिस्थिती वदवून घेतलं आहे. तर, दीपा, कार्तिक आणि सौंदर्या हे लोक आयेशाकडून सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी सगळे प्रयत्न करणार आहेत. दोघींचे कटकारस्थान आता ते उघडकीस आणणार आहेत.
आयेशा देशमुख स्वतःचं सगळं सामान घेऊन इनामदारांच्या घरात राहायला आली आहे. यावेळी दीपा पुन्हा एकदा आपला डाव साधणार आहे. सगळे प्रयत्न करूनही आयेशा सत्य सांगत नाही, हे बघून आता त्यांनी साक्षीचं भूत आणण्याचा निर्णय घेतला आहे. आयेशाने इनामदारांच्या घरात एन्ट्री केल्याने त्यांचा अर्धा प्लॅन तर यशस्वी झाला आहे. मात्र, आता आयेशाकडून सत्य कसं काढून घ्यायचं यासाठी ते तिला घाबरवणार आहेत. साक्षीचा खून आयेशाने केला होता. यामुळे आता आयेशा तिलाच घाबरले हे लक्षात आल्याने त्यांनी हा डाव रचला आहे.
आयेशा खोलीत मध्यरात्री हा भूताचा डाव मांडला जाणार आहे. दीपा आणि सगळ्यांनी मिळून साक्षीसारख्या दिसणाऱ्या एका महिलेला बोलवून तिच्याकडून हे नाटक करून घेण्याचा डाव आखला आहे. आता साक्षीचं भूत येऊन आयेशाला सत्य सांगायला भाग पाडणार आहे. दीपा आणि इनामदारांचा हा डाव आता यशस्वी होईल का? हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये कळणार आहे.
संबंधित बातम्या