Rang Maza Vegla: आयेशा अखेर इनामदार कुटुंबात येणार! दीपा-कार्तिकचा डाव आता तरी यशस्वी होणार?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rang Maza Vegla: आयेशा अखेर इनामदार कुटुंबात येणार! दीपा-कार्तिकचा डाव आता तरी यशस्वी होणार?

Rang Maza Vegla: आयेशा अखेर इनामदार कुटुंबात येणार! दीपा-कार्तिकचा डाव आता तरी यशस्वी होणार?

Published Aug 25, 2023 01:12 PM IST

Rang Maza Vegla Latest Episode 25 August 2023: आयेशा देशमुख, तिची आई आणि श्वेता यांना चांगला धडा शिकवण्यासाठी दीपा आणि संपूर्ण इनामदार कुटुंबाने एक योजना आखली आहे.

Rang Maza Vegla Latest Episode 25 August 2023
Rang Maza Vegla Latest Episode 25 August 2023

Rang Maza Vegla Latest Episode 25 August 2023: छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या कथानकाने आता चांगलाच वेग घेतला आहे. आता इनामदार कुटुंबाने आपल्या परिवारच्या आनंदासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी मोठं पाऊल उचललं आहे. आयेशा आणि श्वेताला धडा शिकवून आता कार्तिक आणि दीपा पुन्हा एकदा त्यांचा आनंदी संसार सुरू करणार आहेत. यासाठी आता त्यांनी पहिलं पाऊल टाकलं आहे. त्यांच्या योजनेनुसार आता आयेशा या डावात अडकणार आहे.

आयेशा देशमुख, तिची आई आणि श्वेता यांना चांगलाच धडा शिकवण्यासाठी दीपा आणि संपूर्ण इनामदार कुटुंबाने एक योजना आखली आहे. या प्लॅननुसार दीपा आणि कार्तिक एकमेकांशी वाद घालणार असून, आयेशाला पुन्हा इनामदार कुटुंबात घेऊन येण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आयेशाला या डावात अडकवून ते तिच्याकडून सत्य वदवून घेणार आहेत. तर, दुसरीकडे आयेशाच्या आईला आणि आर्यन यांना अद्दल घडवण्याचा विडा आता कार्तिकीने उचलला आहे. तिने दोघांनाही धमकी देऊन गप्प केलं आहे. आर्यन आणि त्याच्या आजीने केलेल्या सगळ्या गुन्ह्याचे पुरावे आता कार्तिकीच्या हाती लागले आहेत.

Ketaki Mategaonkar: केतकी माटेगावकर दिसणार धमाकेदार भूमिकेत; 'अंकुश'चा जबरदस्त टीझर रिलीज!

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये आयेशा देशमुख स्वतःचं सगळं सामान घेऊन इनामदारांच्या घरात प्रवेश करणार आहे. यावेळी दीपा पुन्हा एकदा गोंधळ घालणार आहे. ती आयेशाला इनामदार कुटुंबात येण्यापासून रोखणार आहे. आता जर आयेशा या घरात आली तर, मी हे घर सोडून निघून जाईन, असा पवित्रा दीपाने घेतला आहे. तर, तू जेव्हा नव्हतीस, तेव्हा कार्तिकसोबत आयेशा होती. त्यामुळे आयेशा याच घरात येणार, असा हुकुम सौंदर्या इनामदार यांनी सोडला आहे. अर्थात हा त्यांच्या प्लॅनचा एक भाग आहे. आता आयेशाने या घरात एन्ट्री घेतली तर दीपा आणि कार्तिकचा प्लॅन पूर्ण होणार आहे.

मात्र, आता त्यांच्या या प्लॅनची कुणकुण श्वेताला लागली आहे. सौंदर्या इनामदार इतक्या बदलूच शकत नाहीत, त्या हे सगळं नाटक करत आहेत, असे श्वेताला वाटत आहे. आता ती या प्लॅनमध्ये मोडता घालण्याचा प्रयत्न करू शकते. जर, श्वेताने यात हस्तक्षेप केलाच तर कार्तिक आणि दीपाचा हा प्लॅन फसण्याची शक्यता आहे. आता मालिकेत पुढे रंजक कथानक पाहायला मिळणार आहे.

Whats_app_banner