Rang Maza Vegla Latest Episode 24 August 2023: ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत आता धमाकेदार ट्वीस्ट बघायला मिळणार आहे. एकीकडे दीपा आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाने मिळून केलेला प्लॅन यशस्वी होताना दिसत आहे. मात्र, याच दरम्यान, आता त्यांच्या प्लॅनची कुणकुण श्वेताला लागणार आहे. यावेळी श्वेता नक्की कुणावर विश्वास ठेवावा या संभ्रमात पडणार आहे. मात्र, आता यामुळे सौंदर्या आणि दीपाच्या प्लॅनला धोका निर्माण झाला आहे. एकीकडे कार्तिकी एकटी आर्यन आणि त्याच्या आजीला धडा शिकवत आहे. तर, दुसरीकडे दीपा, दीपिका आणि सौंदर्या मिळून आयेशा आणि श्वेताला फैलावर घेत आहेत.
प्लॅननुसार श्वेताला आपण तुझ्या बाजूने आहोत असे दाखवून कार्तीकीने सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करून घेतल्या आणि त्या पोलिसांना पाठवल्या आहेत. तर, पोलीस देखील आता देशमुख बाई आणि त्यांच्या नातवाला म्हणजेच आर्यनला अटक करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले आहेत. मात्र, यावेळी कार्तिकीला त्या घरात बघून पोलीसही गोंधळात पडले आहेत. पोलिसांनी कार्तिकीला प्रश्न केला की, ‘आम्ही तुमच्या किडनॅपिंग केसमध्ये देशमुख बाईंना अटका करण्यासाठी आलो होतो, पण तुम्ही इथे काय करताय?’ यावर कार्तिकी म्हणणार आहे की, ‘तुम्हाला गैरसमज झाला आहे, असे काही घडले नाहीये.’ त्यावेळी पोलीस निघून जातील. मात्र, कार्तिकी देशमुख बाईंना आणि आर्यनला पुरावे दाखवून धमकावणार आहे.
तर, दुसरीकडे आयेशा, कार्तिक आणि दीपा यांच्यात मोठा वाद होणार आहे. आयेशा जर कार्तिकच्या आयुष्यात आली तर मी हे घर सोडून निघून जाईन अशी धमकी दीपा देणार आहे. तर, माझ्यावर आणि दीपिकावर केवळ रंगामुळे अत्याचार आणि अपमान होत असल्याच आरोप देखील ती करणार आहे. यावर सौंदर्या आयेशाची बाजू घेऊन दीपालाच बोल लगावणार आहे. दीपाच्या रंगावरून ती पुन्हा एकदा तिला बोल लागाव्णार आहे. यावेळी पुन्हा एकदा जुनी सौंदर्या इनामदार पाहायला मिळणार आहे.
मात्र, सौंदर्या इनामदार अशी एका रात्रीत कशी काय बदलली, की हे नक्कीच एखादं नाटक आहे, अस संशय श्वेताच्या मनात येणार आहे. तर, सौंदर्याच्या वागणुकीमुळे तो संशय आणखी बळावेल की, मिटून जाईल हे आगामी भागात कळणार आहे.
संबंधित बातम्या