Rang Maza Vegla: ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली आनंदाची बातमी! पोस्ट लिहित म्हणाली...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rang Maza Vegla: ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली आनंदाची बातमी! पोस्ट लिहित म्हणाली...

Rang Maza Vegla: ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली आनंदाची बातमी! पोस्ट लिहित म्हणाली...

Sep 20, 2023 01:07 PM IST

Rang Maza Vegla Actress Good News: अभिनेत्री अनघा अतुल हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंसोबतच तिने एक आनंदाची बातमी देखील सांगितली आहे.

Actress Anaghaa Atul
Actress Anaghaa Atul

Rang Maza Vegla Actress Good News: छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ आता ऑफ एअर गेली असली तरी, यातील कलाकारांची सोशल मीडियावर जोरदार हवा पाहायला मिळत आहे. या मालिकेतील सगळेच कालकार सोशल मीडियावर तुफान सक्रिय आहे. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील ‘श्वेता’ म्हणजेच अभिनेत्री अनघा अतुल हिने तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. अभिनयासोबतच तिने आता व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांना सांगितली आहे.

अभिनेत्री अनघा अतुल हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंसोबतच तिने एक आनंदाची बातमी देखील सांगितली आहे. यासोबतच अनघाने चाहत्यांकडे प्रेम, आशीर्वाद आणि पाठिंबा मागितला आहे. अनघा अतुल भगरे हिने गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या आयुष्यातील एका नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले की, ‘वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ असं म्हणतात कुठल्याही कार्याची सुरूवात बाप्पाच्या नावाने करतात. त्यात बाप्पाच्या आगमनाचा दिवस असेल याहुन मंगल दिवस नाही.’

Viral Video: ‘जवान’च्या लूकमध्ये चाहत्यांचा राडा; ‘टायगर ३’चे पोस्टर फाडणाऱ्यांना पोलिसांचा दणका!

पुढे अनघा लिहिते, ‘गेले काही दिवस एकच प्रश्न विचारला जातोए, “आता पुढे काय?” तर यापुढे पुणेकरांच्या ह्रदयात थोडी जागा निर्माण करायचं ठरवलंय! मी आणि माझा भाऊ घेऊन येतोए “वदनी कवळ” परिपूर्ण थाळीचा आस्वाद. शुद्ध, सात्विक आणि रुचकर जेवण. पुण्याचं हृदय असलेल्या ठिकाणी म्हणजेच डेक्कनमध्ये... लवकरच येतय तुमच्या भेटीला. खूप धाडस करुन हे पाऊल उचलते आहे. अभिनेत्री म्हणून खूप प्रेम मिळालं, आता उद्योजिका म्हणून तुमच्या सहकार्याची, प्रेमाची आणि आशिर्वादाची गरज आहे. ।।गणपती बाप्पा मोरया।।'

अभिनेत्री अनघा अतुल हिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते आणि प्रेक्षक तिच्या या पोस्टवर भरभरून कमेंट करून शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. सुयश टिळक, स्पृहा जोशी, ऋतुजा बागवे, अक्षर कोठारी, अर्चना निपाणकर, अपूर्वा गोरे अशा अनेक कलाकारांनी अनघाच्या या नव्या ‘रुचकर’ प्रवासाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Whats_app_banner