CAT Trailer Out: ड्रग्ज तस्करांना धडा शिकवण्यासाठी रणदीप हुडा सज्ज! ‘कॅट’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  CAT Trailer Out: ड्रग्ज तस्करांना धडा शिकवण्यासाठी रणदीप हुडा सज्ज! ‘कॅट’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

CAT Trailer Out: ड्रग्ज तस्करांना धडा शिकवण्यासाठी रणदीप हुडा सज्ज! ‘कॅट’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Updated Nov 18, 2022 06:12 PM IST

CAT Trailer Out: नेटफ्लिक्सच्या ‘कॅट’ या वेब सीरिजमधून अभिनेता रणदीप हुडा लवकरच एक नवी भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकताच या वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

Randeep Hooda
Randeep Hooda

CAT Trailer Out: बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडा (Randeep Hooda) आपल्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करत असतो. प्रत्येक चित्रपटांसाठी तो विशेष मेहनत घेताना दिसतो. आता लवकरच एका दमदार भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्सच्या ‘कॅट’ या वेब सीरिजमधून अभिनेता रणदीप हुडा लवकरच एक नवी भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकताच या वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ‘कॅट’ ही एक क्राईम थ्रिलर सीरिज असणार आहे.

या वेब सीरिजमध्ये रणदीप एका पंजाबी व्यक्तीची भूमिका साकारत आहे. ‘कॅट’ची कथा गुरनाम सिंह नावाच्या एका व्यक्तीच्या आयुष्याभोवती फिरणार आहे. गुरनाम आपलं सरळ साधं आयुष्य जगत असतो. मात्र, त्याच्या आयुष्यात काही अशा गोष्टी घडतात, ज्यामुळे त्याला पोलिसांसाठी खबरी म्हणून काम करावे लागले. गुरनामचा भाऊ एका ड्रग्ज डीलमध्ये पकडला जातो. अशावेळी गुरनाम या ड्रग्ज तस्करांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांचा खबरी बनतो. या दरम्यान त्याला अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. मात्र, या सगळ्याचा सामना करतही तो आपलं मिशन यशस्वी करतो, अशी या वेब सीरिजची कथा असणार आहे.

या सगळ्यात मात्र गुरनाम देखील अडकताना दिसणार आहे. या सगळ्यात पोलीस गुरनामचा वापर करून घेणार का? पोलिसांकडून गुरनामला धोका होणार का? गुरनाम आपल्या भावाला यातून बाहेर काढू शकेल का? या सगळ्याची उत्तरं या वेब सीरिजमधून मिळणार आहे. अभिनेता रणदीप हुडा एका वेगळ्या आणि दमदार भूमिकेत दिसणार आहे. नेटफ्लिक्सची रणदीप हुडा अभिनित ‘कॅट’ ही वेब सीरिज या ९ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेता रणदीप हुडा देखील त्याच्या या वेब सीरिजसाठी उत्सुक आहे. आपल्या पात्राबद्दल बोलताना रणदीप म्हणाला की, ‘गुरनाम सिंह एका अतिशय साधा आणि सरळ माणूस आहे. शांत स्वभावाचा गुरनाम जेव्हा या चक्रव्हूवात अडकतो, तेव्हा मात्र तो स्वतःला कमालीचा बदलतो. गुरनामची पुढची खेळी काय असणार, याची प्रेक्षक कल्पना देखील करू शकणार नाहीत.’

Whats_app_banner