मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला? पहिल्या दिवशी अवघी ‘इतकी’ कमाई!

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला? पहिल्या दिवशी अवघी ‘इतकी’ कमाई!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 23, 2024 09:50 AM IST

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचे पहिल्या दिवशीचे कलेक्शन समोर आले आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली ते जाणून घेऊया...

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला? पहिल्या दिवशी अवघी ‘इतकी’ कमाई!
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला? पहिल्या दिवशी अवघी ‘इतकी’ कमाई!

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता. रणदीप हुड्डा आणि अंकिता लोखंडे यांची मुख्य भूमिका असलेला 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपट २२ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रणदीपसोबत अंकिता लोखंडे आणि अमित सियाल हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. आता या चित्रपटाचे पहिल्या दिवशीचे कलेक्शन समोर आले आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली ते जाणून घेऊया...

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी अवघ्या १.१५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. मात्र, हे सुरुवातीचे आकडे असून, यामध्ये काही बदलही होऊ शकतात. मात्र, १.१५ कोटींचे कलेक्शन या चित्रपटाच्या दृष्टीने फारसे चांगले म्हणता येणार नाही. मात्र, शुक्रवारी 1 कोटींहून अधिक कमाई करण्यात यश मिळवलेल्या या चित्रपटाला, शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमुळे फायदा होण्याची शक्यता आहे. तर, त्यामुळे हा कलेक्शनचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

रणदीपने केले या चित्रपटाचे दिग्दर्शन!

या चित्रपटात रणदीप हुड्डा विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारताना दिसत आहे. मुख्य भूमिका करण्यासोबतच त्याने या चित्राचे दिग्दर्शनही केले आहे. यातून त्याने दिग्दर्शनाच्या जगातही प्रवेश केला आहे. या चित्रपटात रणदीपसोबत अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत झळकली आहे. तिने या चित्रपटात वीर सावरकरांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित आणि संदीप सिंग यांनी केली आहे.

Viral Video: ‘शिस्त आहे की नाही..’ अंकिता लोखंडे मीडियावर भडकली! नेमकं काय झालं? पाहा व्हिडीओ

मात्र, या चित्रपटासाठी रणदीपने स्वत:ला ज्याप्रकारे बदलून टाकले, त्यामुळे तो खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटात विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारण्यासाठी रणदीपने स्वत:ला त्या व्यक्तिरेखेत पूर्णपणे सामावून घेण्यासाठी तब्बल ३० किलो वजन कमी केले. त्याने वजन कमी केल्यानंतरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

मडगाव एक्स्प्रेसचीही दुरवस्था!

अभिनेता दिव्येंदू शर्माचा 'मडगाव एक्स्प्रेस' हा चित्रपटही २२ मार्चला प्रदर्शित झाला होता. मात्र, हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फारच थंड पडला आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ १.५० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कुणाल खेमूने केले आहे. एकंदरीतच या चित्रपटांना प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.

IPL_Entry_Point