'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाच्या ऑस्कर प्रवेशाचा दावा खोटा? FFIच्या अध्यक्षांनी सांगितले सत्य-randeep hooda movie swatantrya veer savarkar movie is not going for oscar 2025 ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाच्या ऑस्कर प्रवेशाचा दावा खोटा? FFIच्या अध्यक्षांनी सांगितले सत्य

'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाच्या ऑस्कर प्रवेशाचा दावा खोटा? FFIच्या अध्यक्षांनी सांगितले सत्य

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 25, 2024 09:54 AM IST

Swatantrya Veer Savarkar: रणदीप हुड्डाच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाबाबत निर्माते संदीप सिंह यांनी मंगळवारी पोस्ट केली की, हा चित्रपट ऑस्कर २०२५ साठी गेला आहे. पण आता याबाबतचे सत्य समोर आले आहे.

रणदीप हुड्डा
रणदीप हुड्डा

Swatantrya Veer Savarkar: बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट ऑस्कर २०२५मधील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या नॉमिनेशनसाठी पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. ही बातमी ऐकून चाहत्यांना आनंद झाला, पण त्याचवेळी काही लोकांनी यावर प्रश्नही उपस्थित केले. मात्र, आता ही माहिती खोटी असल्याचे फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने म्हटले आहे. ऑस्करसाठी भारतातून अधिकृतरित्या 'लापता लेडीज' हा चित्रपट पाठवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने सांगितले सत्य

ऑस्करसाठी भारतातून 'लापता लेडीज' आणि 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हे दोन चित्रपट पाठवण्यात आल्याचे म्हटले जात होते. या प्रकरणी एचटी सिटीने एफएफआयचे अध्यक्ष रवी कोटकारा यांना विचारणा केली. त्यावेळी त्यांनी, '(सावरकर चित्रपटाच्या निर्मात्यांनी) चुकीची माहिती दिली आहे. याबाबत मी लवकरच निवेदन जारी करणार आहे. भारतातून केवळ एकच चित्रपट लापता लेडीज हा ऑस्करसाठी अधिकृतपणे पाठवण्यात आला आहे' असे म्हटले.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिली होती माहिती

'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाचे सहनिर्माते आनंद पंडित यांना ऑस्करविषयी विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी, 'मला आमचा चित्रपट ऑस्करसाठी कसा गेला याबाबत माहिती नाही. मला सोमवारी याविषयी सांगण्यात आले होते. चित्रपट ऑस्करसाठी जाणे ही खूप मोठी गोष्ट आहे. मला ऐकूनही आनंद झाला होता' असे उत्तर दिले होते.

'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट ऑस्करला जाणार असल्याची बातमी चित्रपटाचे निर्माते संदीप सिंग यांनी सोशल मीडियावर दिली होती आणि रणदीपसोबत या चित्रपटात अंकिताची मुख्य भूमिका असल्याने त्यांनी त्यात अंकिता लोखंडेलाही टॅग केले होते. या चित्रपटाचा अभिनेताच नव्हे तर दिग्दर्शकही असलेल्या रणदीपने यावर कोणतीही पोस्ट केली नाही. याबाबत एचटी सिटीने रणदीपला विचारण्याचा प्रयत्न केला असता अभिनेता उत्तर देण्यासाठी उपलब्ध होऊ शकला नाही.
वाचा: अशी मी मदनमंजिरी सुबक ठेंगणी लखलखते सुंदरी; 'फुलवंती'मधील पहिल्या गाण्याने लावले प्रेक्षकांना वेड

'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाविषयी

'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटात रणदीप हुड्डा आणि अंकिता लोखंडे महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. रणदीपला स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट बनवण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. इतकंच नाही तर त्याने आपल्या अनेक मालमत्ता विकून हा चित्रपट बनवला. दिग्दर्शक म्हणून रणदीपचा हा पहिलाच चित्रपट होता. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. आता हा चित्रपट ऑस्करसाठी गेल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, या सर्व अफवा असल्याचे फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे.

Whats_app_banner
विभाग