मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Swatantryaveer Savarkar: मुझे गांधीसे नहीं, अहिंसासे नफरत है; ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

Swatantryaveer Savarkar: मुझे गांधीसे नहीं, अहिंसासे नफरत है; ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 31, 2024 09:38 AM IST

Randeep Hooda upcoming movie: अभिनेता रणदीप हुड्डाने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटातील लूक शेअर करत प्रदर्शनाची तारीख जाहिर केली आहे.

Swatantryaveer Savarkar movie
Swatantryaveer Savarkar movie

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अष्टपैलू अभिनेता म्हणून रणदीप हुड्डा (Randeep Hooda) ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी खासगी आयुष्यामुळे चर्चेत असणारा रणदीप आता त्याचा आगामी चित्रपट ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील रणदीपचा नवा लूक आणि प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.

"स्वातंत्र्यवीर सावरकर" (Swatantryaveer Savarkar) या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरुवातीला महेश मांजरेकर करणार होते. मात्र काही कारणास्तव त्यांनी या चित्रपटातून काढता पाय घेतला. त्यानंतर अभिनेता रणदीप हुड्डाने दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली. जानेवारी महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात होते. पण आता निर्मात्यांनी महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त पोस्ट शेअर करत प्रदर्शनाची तारीख जाहिर केली आहे.
वाचा: ‘येऊ कशी तशी मी नांदायला'मधील ओम येणार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, दिसणार ‘या’ मालिकेत

रणदीपने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने "भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील दोन हीरो, एकाला लोकांनी डोक्यावर घेतले तर दुसऱ्याला इतिहासाच्या पानांतून वगळले. आज या दिवशी इतिहास पुन्हा लिहिला जाईल” असे म्हटले आहे. तसेच व्हिडीओच्या बॅकग्राऊंडमध्ये 'मुझे गांधीसे नहीं, अहिंसासे नफरत है' हा डायलॉग ऐकू येत आहे. सध्या सोशल मीडियावर चित्रपटाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

"स्वातंत्र्यवीर सावरकर" हा चित्रपट २२ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणदीप हुड्डासह अंकिता लोखंडे व अमित सियाल हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटासाठी रणदीप हुड्डानेही प्रचंड मेहनत घेतलेली आहे. प्रेक्षक त्याला या भूमिकेत पाहण्यासाठी फारच उत्सुक आहेत. हा चित्रपट हिंदीसह मराठी भाषेत प्रदर्शित होणार आहे.

"स्वातंत्र्यवीर सावरकर" हा चित्रपट विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित बयोपिक असल्याचे समजतय. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रभावशाली व्यक्ती असणाऱ्या सावरकरांचा प्रेरणादायी प्रवास आणि स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्न, त्यांच्या विचारधारा, बलिदान आणि राष्ट्राप्रती अतूट बांधिलकी यावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट असणार आहे.

रणदीप हुड्डा विषयी बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वी तिने गर्लफ्रेंड लिन लैशरामशी मणिपूरी पद्धतीने लग्नगाठ बांधली. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थित त्यांचा लग्नसोहळा झाला. त्यानंतर मुंबईत झालेल्या रिसेप्शनला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली.

WhatsApp channel

विभाग