Viral Video: रणबीर कपूरने गुपचूप कतरिना कैफचे फोटो काढले? ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण!-ranbir kapoor viral video from ayodhya ranbir is trying to capture katrina kaif in selfie photo ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: रणबीर कपूरने गुपचूप कतरिना कैफचे फोटो काढले? ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण!

Viral Video: रणबीर कपूरने गुपचूप कतरिना कैफचे फोटो काढले? ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण!

Jan 23, 2024 08:14 AM IST

Ranbir Kapoor Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे लोक रणबीर कपूरची खिल्ली उडवू लागले आहेत.

Ranbir Kapoor Viral Video
Ranbir Kapoor Viral Video

Ranbir Kapoor Viral Video: अयोध्येतील राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम पूर्ण झाला आहे. या दरम्यानचे, अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होतीत्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सुभाष घई, रणबीर, कतरिना यांच्यासह अनेकजण बसलेले दिसत आहेत. यामध्ये रणबीर कपूर असे काही करताना दिसला आहे की, सोशल मीडियावर त्याचीच चर्चा सुरू आहे. एकीकडे रणबीर बसलेला असताना, दुसरीकडे आलिया शेजारी बसून मुकेश अंबानींच्या मोठ्या सुनेशी गप्पा मारताना दिसली आहे.

मनोरंजन विश्वातील अनेक लोक हा खास सोहळा अनुभवण्यासाठी अयोध्येत पोहोचले होते. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे लोक रणबीर कपूरची खिल्ली उडवू लागले आहेत. या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर अशा प्रकारे सेल्फी घेताना दिसत आहे की, बघणाऱ्या सगळ्यांनाच वाटेल की तो मागे बसलेल्या कतरिना कैफचे गुपचूप फोटो काढत आहे. त्याचा हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे.

Bigg Boss 17: हो मी चुकलो; विकी जैनने मीडियासमोरच गुडघे टेकले अन् अंकिता लोखंडेची माफी मागितली!

चित्रपट निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई यांनी हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. यामध्ये दिसत आहे की, कतरिना कैफ डोक्याला स्कार्फ बांधून मागे पती विकी कौशल याच्यासोबत बसली आहे. तर, त्यांच्या पुढेच श्लोका अंबानी बसली आहे आणि ती शेजारी बसलेल्या आलिया भट्टशी गप्पा मारत आहे. ते, रणबीर कपूर आलियाच्या शेजारी बसला आहे. यावेळी रणबीर कपूर अचानक मोबाईल उचलतो आणि सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो. विशेष म्हणजे कतरिना कैफ तिचा पती विकी कौशलसोबत अगदी रणबीरच्या मागे बसली होती. व्हिडीओ पाहून अनेकांना असे वाटत आहे की, रणबीर कतरिनाला आपल्या कॅमेरात कैद करण्याचा प्रयत्न करत आहे.

या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी देखील भरभरून कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘रणबीर कतरिना कैफचा फोटो काढत आहे.’ तर, दुसऱ्याने लिहिले की, ‘रणबीरने कतरिनाचा फोटो काढण्यासाठी आपली सर्व शक्ती वापरली.’ तर, ‘इथे आल्यानंतरही या बॉलिवूडवाल्यांनी भक्तीऐवजी वैयक्तिक गप्पागोष्टी सुरू केल्या’, अशी प्रतिक्रिया काही लोकांनी दिल्या आहेत. एकाने लिहिले की, ‘रणबीर हे जे काही करतोय, त्यावर माझी नजरच हटत नाहीये.’ दुसऱ्याने लिहिले की, ‘रणबीर कॅटसोबत सेल्फी घेत आहे.’ तर, काहींनी रणबीर मंदिराचे फोटो काढत आहे, असे म्हणत त्याची पाठराखण केली आहे.