बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा इंडस्ट्रीचा नवा सुपरस्टार म्हणून उदयास आला आहे. त्याचे शेवटचे काही चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरले आहेत आणि चाहते आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. चला तर मग जाणून घेऊया रणबीर कपूरच्या त्या चित्रपटांबद्दल, जे बॉक्स ऑफिसवर धमाल करायला तयार आहेत. यातील काही चित्रपट ॲक्शन चित्रपट आहेत, तर काही रोमँटिक चित्रपट आहेत.
यादीतील पहिले नाव अशा चित्रपटाचे आहे, ज्याच्या पहिल्या भागाने हे सिद्ध केले आहे की, लोकांनी रणबीरला त्याच्या क्रूर अवतारात देखील स्वीकारले आहे. संदीप रेड्डी वंगा यांच्या 'ॲनिमल' चित्रपटाचा दुसरा भाग 'ॲनिमल पार्क'मध्ये रणबीर पुन्हा एकदा उग्र अवतारात दिसणार आहे.
‘ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्टला एकत्र पाहून चाहत्यांचा उत्साह वेगळ्याच पातळीवर पाहायला मिळाला. आता निर्माते त्यांना पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटात दोघेही एकत्र दिसणार आहेत. पुढील वर्षी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
रणबीर कपूरच्या आगामी चित्रपटांमध्ये 'रामायण' या मोस्ट अवेटेड चित्रपटाचाही समावेश आहे. चित्रपटाचे बजेट ८५० कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे, ज्यात साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे.
कारण हा चित्रपट एक नव्हे तर दोन भागांमध्ये बनवला जाणार असून, रणबीर कपूरला रामाच्या भूमिकेत पडद्यावर एकदा नव्हे, तर दोनदा पाहण्याची संधी मिळणार आहे. दुसरा भाग प्रदर्शित होण्यास जास्त वेळ लागू नये, यासाठी चित्रपटाचे दोन्ही भाग एकाच वेळी शूट करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे वृत्त आहे.
२०२२मध्ये रिलीज झालेला रणबीरचा मल्टीस्टारर चित्रपट 'ब्रह्मास्त्र' लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा थिएटरमध्ये गर्दी खेचून आणण्यात यशस्वी ठरला. आता या चित्रपटाचा दुसरा भाग पुन्हा एकदा दमदार ॲक्शन घेऊन येणार आहे, ज्यामध्ये आलिया-रणबीर पुन्हा एकत्र दिसणार आहेत.
‘ब्रह्मास्त्र’ हा मोठा चित्रपट असल्याने कथा दोन भागांमध्ये संपणार नाही. चित्रपटाचा तिसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण, त्यासाठी खूप वाट पाहावी लागणार आहे. कारण, निर्माते अजून दुसरा भाग पूर्ण करू शकलेले नाहीत. मात्र खरा क्लायमॅक्स भाग- ३ मध्येच होणार असल्याने त्याबाबत उत्सुकता वाढणे स्वाभाविक आहे.