मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ranbir Kapoor : बॉबी देओलने शर्ट काढताच घाबरलो होतो; रणबीर कपूरने सांगितला किस्सा

Ranbir Kapoor : बॉबी देओलने शर्ट काढताच घाबरलो होतो; रणबीर कपूरने सांगितला किस्सा

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 29, 2024 02:11 PM IST

Bobby Deol: अभिनेता रणबीर कपूरने नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाच्या ऑडिशनच्या वेळचा किस्सा सांगितला आहे.

Ranbir Kapoor
Ranbir Kapoor

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि बॉबी देओल महत्त्वाच्या भूमिकेत असणारा 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट डिसेंबर महिन्यात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. त्यानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये रणबीरने चित्रपटाच्या ऑडिशनच्या वेळचा किस्सा सांगितला आहे.

'अ‍ॅनिमल' या चित्रपट बॉबी आणि रणबीर यांचे अनेक अॅक्शन सीन्स दाखवले आहेत. दोघांमध्ये जोरदार भांडणे देखील होताना दिसत आहेत. चित्रपटगृहांमध्ये तर अक्षरश: त्यांच्या एण्ट्रीवर टाळ्यांचा कडकडात होताना दिसत आहे. पण तुम्हाला माहिती आहे जेव्हा सेटवर बॉबी देओलने शर्ट काढला तेव्हा रणबीर घाबरला होता. त्याला असे वाटले की हा चित्रपट त्याच्या हातून निसटला. नेमकं काय झाले चला जाणून घेऊया...
वाचा: 'फायटर'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तिसऱ्या दिवशी कमावले इतके कोटी

रणबीरने नुकताच नेटफ्लिक्स इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने सेटवरचा किस्सा सांगितला आहे. "अ‍ॅनिमल'च्या शूटिंगआधी मला जिममधील ट्रेनर्सने शर्ट काढायला लावले होते. माझी बॉडी त्यांना आवडली होती. त्यामुळे त्यांना फोटो काढायचे होते. मी शर्ट काढल्यानंतर संपूर्ण यूनिटने टाळ्या वाजवल्या होत्या. त्यानंतर दोन दिवसांनी बॉबी देओल सेटवर आला आणि त्याने शर्ट काढले. त्यानंतर मला आणि ट्रेनर्सला असे वाटले होते की, आता माझा पत्ता कट होणार" असे रणबीर म्हणाला.

अ‍ॅनिमल हा चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केले आहे. चित्रपटात रणबीरसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तर बॉबी देओलने खलनायकाची भूमिका साकारली आहे. अनिल कपूर यांनी साकारलेली वडिलांची भूमिका देखील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

WhatsApp channel

विभाग