मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  निर्मात्यांच्या हातापाया पडून रणबीरने मिळवलीय 'शमशेरा'त भूमिका, म्हणाला, 'मी तर
शमशेरा
शमशेरा
25 June 2022, 11:54 ISTPayal Shekhar Naik
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
25 June 2022, 11:54 IST
  • मला अक्षरशः त्यांची मनधरणी करावी लागली. त्यांना पटवून द्यावं लागलं की मी हे करेन.

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor) सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. त्याच्या 'शमशेरा' (shamshera) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा आहे. चित्रपटातील रणबीरचा लूक आणि भूमिका यामुळे चाहते त्याच्यावर फिदा झाले आहेत. 'संजू' नंतर तब्बल चार वर्षांनी रणबीर अशा दमदार भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यासोबतच रणबीरचा 'ब्रह्मास्त्र देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'शमशेरा' मध्ये रणबीरची दुहेरी भूमिका असल्याचं समोर येत आहे. परंतुं, चित्रपटातील ही भूमिका आपल्याला निर्मात्यांची मनधरणी केल्यानंतर मिळाली असल्याचा खुलासा रणबीरने एका कार्यक्रमात केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

चित्रपटात रणबीर शमशेरा सोबत त्याच्या वडिलांची भूमिका देखील करत आहे. चित्रपटाच्या ट्रेलर लाँन्च कार्यक्रमात रणबीर, संजय दत्त आणि वाणी कपूर यांनी त्यांच्या भूमिकांबद्दल सांगितलं. या कार्यक्रमात बोलताना रणबीर म्हणाला, 'मला फक्त चित्रपटाच्या मुख्य नायकाच्या भूमिकेसाठी विचारणा झाली होती. मला दुहेरी भूमिकेबद्दल विचारणा झाली नव्हती. पण जेव्हा मी चित्रपटाची कथा ऐकली तेव्हा आदित्य चोप्रा आणि करण मल्होत्रा यांना मी म्हटलं की मला त्याच्या वडिलांची भूमिका देखील करू द्या कारण ते खूप महान पात्र आहे. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. मला अक्षरशः त्यांची मनधरणी करावी लागली. त्यांना पटवून द्यावं लागलं की मी हे करेन. त्यानंतर त्यांनी काही लूक टेस्ट केल्या आणि त्यांना पटलं की ठीक आहे हा करू शकतो. सुरुवातीपासूनच मला दोन भूमिका दिल्या गेल्या नव्हत्या. मला त्यांना मनवावं लागलं.'

 

आता चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक आहेत. यात रणबीरला दुहेरी भूमिका साकारताना पाहून प्रेक्षकांना 'बाहुबली' मधील प्रभासची आठवण झाली आहे. त्या चित्रपटातही प्रभासने दोन भूमिका साकारल्या होत्या.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग