Animal Box Office Collection: वीकेंडला पुन्हा दिसला 'अ‍ॅनिमल'चा जलवा! चित्रपटाने पार केला ८०० कोटींचा टप्पा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Animal Box Office Collection: वीकेंडला पुन्हा दिसला 'अ‍ॅनिमल'चा जलवा! चित्रपटाने पार केला ८०० कोटींचा टप्पा

Animal Box Office Collection: वीकेंडला पुन्हा दिसला 'अ‍ॅनिमल'चा जलवा! चित्रपटाने पार केला ८०० कोटींचा टप्पा

Published Dec 18, 2023 09:00 AM IST

Animal Box Office Collection Day 17: अभिनेता रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट रिलीज होऊन तब्ब्ल १७ दिवस झाले आहेत. तरीही जगभरात या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे.

Animal Box Office Collection Day 17
Animal Box Office Collection Day 17

Animal Box Office Collection Day 17: अभिनेता रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता तब्बल २ आठवड्यांहून अधिक काळ लोटला आहे. तरीही जगभरात या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या मधल्या दिवसांत चित्रपटाच्या कमाईचा जो वेग थोडा कमी झाला होता, तोच वीकेंडला पुन्हा वाढताना दिसला आहे. अगदीच अपेक्षेप्रमाणे रणबीरचे चाहते रविवारी त्याचा 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचले होते. यामुळे या वीकेंडला चित्रपटाने तुफान गल्ला जमावला आहे. चला तर, जाणून घेऊया चित्रपटाने रविवारीच्या दिवशी किती व्यवसाय केला?

अभिनेता रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट रिलीज होऊन तब्ब्ल १७ दिवस झाले आहेत. रविवारी या चित्रपटाने एकूण १५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. यासह हा चित्रपट आता भारतीय बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे. भारतात 'अ‍ॅनिमल'चे एकूण कलेक्शन ५१२.९४ कोटी रुपये इतके झाले आहे. सगळ्या भाषांमध्ये मिळून या चित्रपटाने ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे.

Richa Chadha Birthday: पत्रकार बनण्याचं स्वप्न बघणारी ऋचा चड्ढा कशी बनली बॉलिवूड अभिनेत्री?

तर, 'अ‍ॅनिमल'ने १६ दिवसांत जगभरात ८१७.३६ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. १०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट अजूनही कमाईचा रेकॉर्ड तोडत आहे. मात्र, शाहरुख खानच्या 'जवान' आणि 'पठान' या चित्रपटांपासून रणबीरचा 'अ‍ॅनिमल' अजूनही काहीसा दूर आहे. पण, २१ डिसेंबरला शाहरुख खान याचा 'डंकी' रिलीज होण्यापूर्वी 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट १००० कोटींचा आकडा गाठेल, अशी आशा निर्मात्यांना आहे.

'अ‍ॅनिमल'ला मिळालेले जबरदस्त यश पाहून दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनीही 'अ‍ॅनिमल २'वर काम सुरू केले आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात पुन्हा एकदा प्रेक्षकांना तीच स्टार कास्ट पाह्यला मिळू शकते. मात्र, या वृत्तावर अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

'अ‍ॅनिमल' चित्रपटाचे एकूण कलेक्शन:

पहिल्या दिवशी- ६३.८ कोटी

दुसऱ्या दिवशी- ६६.२७ कोटी

तिसऱ्या दिवशी- ७१.४६ कोटी

चौथ्या दिवशी- ४३.९६ कोटी

पाचव्या दिवशी- ३७.४७ कोटी

सहाव्या दिवशी- ३०.३९ कोटी

सातव्या दिवशी- २४.२३ कोटी

आठव्या दिवशी- २२.९५ कोटी

नवव्या दिवशी- ३४.७४ कोटी

दहाव्या दिवशी- ३६ कोटी

अकराव्या दिवशी- १३.८५ कोटी

बाराव्या दिवशी- १३ कोटी

तेराव्या दिवशी- १० कोटी

चौदाव्या दिवशी- ८.७५ कोटी

पंधराव्या दिवशी- ७.५० कोटी

सोळाव्या दिवशी- १३ कोटी

सतराव्या दिवशी- १५ कोटी

Whats_app_banner