Ranbir Kapoor Wish For Deepika's baby: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण हे बॉलिवूडमधील सर्वात लाडक्या जोड्यांपैकी एक आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१८ मध्ये दोघांनी लग्न केलं आणि आता २०२४मध्ये दोघांनी आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं. रविवारी दीपिका पादुकोणने एका गोंडस मुलीला जन्म दिला. या छोट्या पाहुणीच्या आगमनानंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह आता आई-बाबा झाले आहेत. या आधी रणबीर कपूरसोबतही दीपिका पादुकोणचं नाव जोडलं गेलं असल्याने 'अॅनिमल' फेम अभिनेत्याची जुनी विधानंही सध्या चर्चेत आहेत, जी त्याने दीपिका पादुकोण आणि तिच्या बाळाबद्दल केली होती.
‘कॉफी विथ करण सीझन ५’ या रिअॅलिटी शोमध्ये रणवीर सिंह आणि रणबीर कपूर एकत्र आले होते. हे दोन्ही कलाकार अद्याप पडद्यावर एकत्र दिसले नसले, तरी करण जोहरच्या शोमध्ये हे दोघे एकत्र आले होते, तेव्हा त्यांच्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली होती. शोमध्ये करण जोहरने रणबीर कपूर आणि रणवीर सिंह यांच्यात दीपिका पादुकोणसोबतच्या नात्यामुळं काही वाद आहेत का, असा प्रश्न विचारला होता. ज्याला रणबीर कपूरने दिलेलं उत्तर त्याच्या चाहत्यांना आवडलं होतं.
रणबीर कपूर म्हणाला होता की, प्रत्येकजण सकारात्मकपणे पुढे गेला आहे आणि मला वाटते की कॉफी विथ करणनेही आता पुढे जावं. रणबीर कपूर म्हणाला की, परस्पर तणाव खूप आधीच संपला आहे आणि आता तो प्रश्न देखील निरर्थक आहे. रणबीर आणि दीपिका यांच्यात जे काही आहे, त्यावरून मी कधीच प्रभावित झालो नाही, असेही रणवीर सिंगने म्हटले आहे. या मुलाखतीत रणबीर कपूरने रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणच्या जोडीचे कौतुक करत दोघेही एकमेकांसाठी पूर्णपणे असल्याचे म्हटले होते. तसेच, त्यांच्या होणाऱ्या बाळालाही त्यांचं खूप कौतुक वाटेल, असे रणबीर म्हणाला होता.
दीपिका-रणवीर आणि त्यांच्या मुलाबद्दल रणबीर कपूर म्हणाला की, ‘रणवीर आणि दीपिका एकमेकांसाठी पूर्णपणे योग्य आहेत आणि मी प्रार्थना करेन की त्यांचे नाते असेच फुलावे. माझी मुलंही त्यांच्या कामाची फॅन व्हावीत आणि आई-वडिलांना आपला आवडता अभिनेता मानावं, अशी ही प्रार्थना करतो’, असं रणबीर कपूर म्हणाला. रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणच्या मुलीला चाहत्यांनी सोशल मीडियावर वेगवेगळी नावे दिली आहेत. या यादीमध्ये त्यांनी रविका आणि दीपी अशी नावे सुचवली आहेत.