दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचा 'अॅनिमल' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर गाजत आहे. अभिनेता रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. आता या चित्रपटाने नऊ दिवसात जगभरात ६०० कोटी रुपये कमावले. मग भारतात किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
'अॅनिमल' हा सिनेमा १ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 'अॅनिमल'ने ६३.८ कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी ६६.२७ कोटी, तिसऱ्या दिवशी ७१.४६ कोटी, चौथ्या दिवशी ४३.९६ कोटी, पाचव्या दिवशी ३७.४७ कोटी, सहाव्या दिवशी ३०.३९ कोटी, सातव्या दिवशी २४.२३ कोटी, आठव्या दिवशी २२.९५ कोटी आणि नवव्या दिवशी ३७ कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच रिलीजच्या नऊ दिवसांत या सिनेमाने ३९८.५३ कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने ६०० कोटींचा गल्ला जमवला आहे.
वाचा: अभिनेत्री लीलावती यांचे निधन, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली
- पहिला दिवस : ६३.८ कोटी- दुसरा दिवस : ६६.२७ कोटी
- तिसरा दिवस : ७१.४६ कोटी
- चौथा दिवस : ४३.९६ कोटी
- पाचवा दिवस : ३७.४७ कोटी
- सहावा दिवस : ३०.३९ कोटी
- सातवा दिवस : २४.२३ कोटी
- आठवा दिवस : २३.५० कोटी
- नववा दिवस : ३७ कोटी
- एकूण कमाई : ३९८.५३ कोटी
'अॅनिमल' हा चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये सुरुवातीपासूनच उत्सुकता होती. आता चित्रपट येत्या काही दिवसांमध्ये किती कमाई करतो हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या