Animal Box Office Collection Day 18: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा 'अॅनिमल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. तिसऱ्या सोमवारी देखील या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अॅनिमल' चित्रपटाने थिएटरमध्ये आता १८ दिवस पूर्ण केले आहेत. 'अॅनिमल' हा चित्रपट १ डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला होता. 'अॅनिमल'ला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे. त्यामुळेच या चित्रपटाला प्रदर्शित होऊन इतके दिवस उलटले असले, तरी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी होत आहे. रविवारी तब्बल १३ कोटींची कमाई करणाऱ्या रणबीर कपूर-रश्मिका मंदाना स्टारर या चित्रपटाची क्रेझ आठवड्याच्या मधल्या दिवसांमध्येही स्पष्टपणे दिसून आली आहे.
'अॅनिमल' हा चित्रपट लोकांना खूप आवडला आहे. रणबीर कपूर आणि बॉबी देओल स्टारर 'अॅनिमल' निर्मात्यांनी हिंदी व्यतिरिक्त तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये रिलीज केला होता. संदीप रेड्डी वंगा यांच्या चित्रपटाचे कलेक्शन तमिळमध्ये काहीसे कमी होते. परंतु, हिंदी आणि तेलुगूमध्ये या चित्रपटाने प्रचंड कमाई केली आहे. तिसऱ्या सोमवारी देखील या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'अॅनिमल' या चित्रपटाने तिसऱ्या सोमवारी तब्बल ५ कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाची केवळ हिंदी भाषेतील कमाई आतापर्यंत ४६९.७९ कोटींवर पोहोचली आहे.
'अॅनिमल' या चित्रपटाने १८व्या दिवशी तामिळ भाषेत २ लाख रुपये आणि तेलुगूमध्ये ४१ लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. तामिळ भाषेतील 'अॅनिमल'चे कलेक्शन आतापर्यंत ४.२६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर, तेलुगूमध्ये या चित्रपटाने ४२.९६ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
पहिल्या दिवशी- ६३.८ कोटी
दुसऱ्या दिवशी- ६६.२७ कोटी
तिसऱ्या दिवशी- ७१.४६ कोटी
चौथ्या दिवशी- ४३.९६ कोटी
पाचव्या दिवशी- ३७.४७ कोटी
सहाव्या दिवशी- ३०.३९ कोटी
सातव्या दिवशी- २४.२३ कोटी
आठव्या दिवशी- २२.९५ कोटी
नवव्या दिवशी- ३४.७४ कोटी
दहाव्या दिवशी- ३६ कोटी
अकराव्या दिवशी- १३.८५ कोटी
बाराव्या दिवशी- १३ कोटी
तेराव्या दिवशी- १० कोटी
चौदाव्या दिवशी- ८.७५ कोटी
पंधराव्या दिवशी- ७.५० कोटी
सोळाव्या दिवशी- १३ कोटी
सतराव्या दिवशी- १५ कोटी
अठराव्या दिवशी- ५ कोटी
संबंधित बातम्या