Animal BO Collection: बॉक्स ऑफिसवर 'अ‍ॅनिमल'ची छप्परफाड कमाई! १३व्या दिवशी जमवला कोटींचा गल्ला-ranbir kapoor and rashmika mandanna starrer animal box office collection day 13 ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Animal BO Collection: बॉक्स ऑफिसवर 'अ‍ॅनिमल'ची छप्परफाड कमाई! १३व्या दिवशी जमवला कोटींचा गल्ला

Animal BO Collection: बॉक्स ऑफिसवर 'अ‍ॅनिमल'ची छप्परफाड कमाई! १३व्या दिवशी जमवला कोटींचा गल्ला

Dec 14, 2023 09:08 AM IST

Animal Box Office Collection Day 13: 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. पाहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे.

Animal Box Office
Animal Box Office

Animal Box Office Collection Day 13: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याचा 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. पाहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे. आता या चित्रपटाच्या १३व्या दिवसाचे कलेक्शन देखील समोर आले आहे. १३व्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन थोडेसे गडगडले असले, तरी या चित्रपटाची छप्परफाड कमाई सुरूच आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'अ‍ॅनिमल' चित्रपटाने रिलीजच्या १३व्या दिवशी भारतातील सर्व भाषांमध्ये १० कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे.

'अ‍ॅनिमल' या चित्रपटाने १३व्या दिवसाच्या कमाईसह आतापर्यंत एकूण ४६७.८४ कोटींचा व्यवसाय केला आहे. मात्र, हा १३व्या दिवसाच्या कमाईचा आकडा हा १२व्या दिवसापेक्षाही कमी आहे. 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाने १२व्या दिवशी चित्रपटाने जवळपास १३ कोटींची कमाई केली होती. पण, अजूनही 'अ‍ॅनिमल' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, 'अ‍ॅनिमल' जगभरातील बॉक्स ऑफिसवर कल्ला करत आहे. १२व्या दिवशीपर्यंत या चित्रपटाने परदेशात २१० कोटींची कमाई केली होती. यासह, चित्रपटाची एकूण कमाई ७५७ कोटी रुपये झाली आहे. आता हा चित्रपट ८०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यापासून काहीच पावले दूर आहे.

Rana Daggubati Birthday: मृत्यूशी झुंज दिली, एक डोळाही निकामी! राणा दग्गुबातीबद्दल 'हे' माहितीय का?

'अ‍ॅनिमल' या चित्रपटात रणबीर कपूरसोबत रश्मिका मंदाना, बॉबी देओल आणि अनिल कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटावर प्रचंड टीका होऊनही, प्रेक्षक या चित्रपटाकडे वळत आहेत. चित्रपट ज्या वेगाने प्रगती करत आहे, त्यावरून असे दिसून येते की ट्रोलर्सपेक्षा रणबीरचे चाहतेच जास्त आहेत. या चित्रपटाच्या अनेक वादग्रस्त क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण, तरीही लोक चित्रपटगृहांमध्ये ते पाहण्यासाठी रांगा लावत आहेत.

पहिल्या दिवशी- ६३.८ कोटी

दुसऱ्या दिवशी- ६६.२७ कोटी

तिसऱ्या दिवशी- ७१.४६ कोटी

चौथ्या दिवशी- ४३.९६ कोटी

पाचव्या दिवशी- ३७.४७ कोटी

सहाव्या दिवशी- ३०.३९ कोटी

सातव्या दिवशी- २४.२३ कोटी

आठव्या दिवशी- २२.९५ कोटी

नवव्या दिवशी- ३४.७४ कोटी

दहाव्या दिवशी- ३६ कोटी

अकराव्या दिवशी- १३.८५ कोटी

बाराव्या दिवशी- १३ कोटी

तेराव्या दिवशी- १० कोटी

Whats_app_banner