बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांची गणना बॉलिवूडच्या पॉवर कपल्समध्ये केली जाते. दोघेही अनेकदा एकत्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. रणबीर आणि आलियाचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये रणबीर आलियासोबत डिनर डेटवर जाताना दिसला आहे. दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, यावेळी रणबीर आणि आलियाऐवजी लोकांचं लक्ष त्यांच्या आलिशान कारवर केंद्रित झालं आहे.
रणबीर आणि आलियाचा हा व्हिडीओ काल रात्रीचा आहे. या जोडीने एका शाही निळ्या रंगाच्या चमकदार आलिशान कारमध्ये बसून डिनर डेटवर जाण्याचा आनंद लुटला. रणबीर आणि आलियाच्या या आलिशान कारची किंमत जाणून अनेकांना धक्का बसला आहे. त्यांची ही लक्झरी गाडी Bentley Continental GT V8 आहे, ज्याची किंमत तब्बल ८ कोटी रुपये आहे. रणबीरने नुकतीच ही कार खरेदी केली आहे. शनिवारी रात्री रणबीर आणि आलिया या कारमधून एकत्र जाताना दिसले होते. यावेळी रणबीर कार चालवत होता आणि आलिया त्याच्या शेजारच्या सीटवर बसली होती. यावेळी त्यांनी कार थांबवली आणि पापाराझींना फोटो पोज दिल्या. मात्र. या दरम्यानचा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. काही लोक त्यांची तुलना थेट डॉली चहावाल्याशी करत आहेत.
रणबीर आणि आलियाला ८ कोटी रुपयांच्या बेंटलेमध्ये पाहून एका युजरने तुलना डॉली चहावालाशी केली. कमेंट करताना या युजरने लिहिले की, ‘डॉली चायवाला याच्याकडे नेपोटीझमची कोणतीही पदवी नसतानाही रोल्स रॉयस आहे. त्यामुळे तुमची गाडी ही काय मोठी गोष्ट नाही.’ दुसऱ्या युजरने लिहिले, ‘तुम्ही गाडी सेकंड हँड घेतली आहे का?’ तिसऱ्या युजरने कमेंट केली की, ‘तुम्ही एवढ्या महागड्या कारमधून बाहेर फिरता तर किमान ड्रायव्हर ठेवायला हवा होता.’ दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘आम्हा गरीब लोकांना किंमत सांगू नका.’
या कारमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्टला पाहून अनेकांनी हे कपल डिनर डेटवर जात असल्याचा अंदाज बांधला होता. पण, प्रत्यक्षात हे दोघेही बॉलिवूडचे नवविवाहित जोडपे रकुलप्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांना त्यांच्या घरी भेटायला गेले होते. रकुल आणि जॅकीने त्यांच्या घरी एक छोटीशी गेट टुगेदर पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत अयान मुखर्जी आणि नितीश तिवारीही उपस्थित होते. रणबीर लवकरच नितीश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटात रामची भूमिका साकारणार आहे. अयान मुखर्जी त्याच्या आगामी 'ब्रह्मास्त्र २' चित्रपटासाठी देखील चर्चेत आहे, ज्यामध्ये रणबीर आणि आलिया मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
संबंधित बातम्या